मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुख्यमंत्र्यांसह तेजस ठाकरेंवरही किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, म्हणाले....

मुख्यमंत्र्यांसह तेजस ठाकरेंवरही किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, म्हणाले....

'मी लवकरच दिल्लीला जाणार आहे, या सर्व घोटाळ्यांची माहिती ईडी, इन्कम टॅक्स आणि संबंधीत विभागांना देणार आहे'

'मी लवकरच दिल्लीला जाणार आहे, या सर्व घोटाळ्यांची माहिती ईडी, इन्कम टॅक्स आणि संबंधीत विभागांना देणार आहे'

'मी लवकरच दिल्लीला जाणार आहे, या सर्व घोटाळ्यांची माहिती ईडी, इन्कम टॅक्स आणि संबंधीत विभागांना देणार आहे'

    मुंबई, 25 मार्च : महाविकास आघाडी सरकारविरोधात (mva government) आरोपाचा धुरळा उडवणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 'आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे (Tejas Thackery), रश्मी ठाकरे यांनी कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी आणि ल्यूक बेनेडिक्ट यांना २०१९ मध्ये विकली आणि यामध्ये 7 कोटींचा मनी लाँड्ररिंगचा व्यवहार झाला, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे परिवार म्हणजे आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी आणि ल्यूक बेनेडिक्ट यांना २०१९ मध्ये विकली, असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. (IPL 2022: मुंबई इंडियन्स संदर्भात टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा) ही कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या या कंपनीमध्ये 56 टक्के, लुक बॅनटिक ऑस्ट्रेलियाचा 34 टक्के आणि इतरांचा 10 टक्के हिस्सा आहे. या कंपनीच्या व्यवहारासाठी 7 कोटींचा मनी लाँडरिंग व्यवहार झाल्याचा आरोपही सोमय्यांनी केला. मी लवकरच दिल्लीला जाणार आहे, या सर्व घोटाळ्यांची माहिती ईडी, इन्कम टॅक्स आणि संबंधीत विभागांना देणार आहे, असंही सोमय्यांनी सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Kirit Somaiya, Uddhav thackeray

    पुढील बातम्या