मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटणार? उद्धव ठाकरे आणि राज्यपाल आज एकाच व्यासपीठावर

मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटणार? उद्धव ठाकरे आणि राज्यपाल आज एकाच व्यासपीठावर

या शपथविधीच्या वेळी उद्धव ठाकरे आणि भगतसिंग कोश्यारी यांच्यात राज्यातील स्थितीवर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 28 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल सदस्य आमदार नियुक्तीवरून राजकीय पेच निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नियुक्तीबद्दल कोणताच निर्णय न घेतल्यामुळे राजकीय तणाव निर्माण झाला आहे. या वादानंतर मुख्यमंत्री आणि राज्यपाल एकाच व्यासपीठावर येणार आहे.

आज संध्याकाळी हायकोर्टातील मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता यांचा शपथविधी राजभवनावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितीत राहणार आहेत. या शपथविधीच्या वेळी  उद्धव ठाकरे आणि भगतसिंग कोश्यारी यांच्यात राज्यातील स्थितीवर चर्चा होणार आहे. त्याच बरोबर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -कोरोनाला संपवण्यासाठी देशात पहिला मोठा प्रयत्न, राज्य सरकारचे उचलले पाऊल

याच प्रस्तावात उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेचे सदस्य बनवण्यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुढील सहा महिन्यांच्या आत  उद्धव ठाकरे यांना विधानसभा किंवा विधान परिषद या दोघांपैकी एका सभागृहाचं सदस्य बनणे आवश्यक आहे.

परंतु, उद्धव ठाकरे यांचा सहा महिन्याचा कालावधी पुढील महिन्यातील 28 मे रोजी संपत आहे. सध्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, अजूनही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सही केलेली नाही. त्यामुळे कोरोना सारख्या महामारीच्या संकटाच्यावेळीही विरोधक राजकारण करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सरू आहे.

हेही वाचा - राज्यातील महापालिकांची मुदत संपणार, आता होणार असा बदल

राज्यपालांना प्रस्तावाचं स्मरण करून देण्याचा निर्णय

दरम्यान, सोमवारी रात्री राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला महाविकासआघाडीचे सर्वच प्रमुख मंत्री हजर होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य करण्या बाबतच्या प्रस्तावावर पुन्हा चर्चा झाली. राज्यपालांना प्रस्तावाचे स्मरण करून दिले. या संदर्भात नवीन किंवा सुधारीत प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही. आधीच्याच प्रस्तावाचं स्मरण करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 28, 2020, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading