मुंबई, 20 एप्रिल : भाजपला (BJP) रेमडेसीवीर इंजेक्शनचा(remdesivir injection) साठा पुरवणाऱ्या ब्रुक फार्मा (brook pharma company) संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. अखेर या प्रकरणी राज्य सरकारने कारवाईचे संकेत दिले आहे. एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे (Abhimanyu Kale) यांच्यावर कारवाई करण्याचे पाऊल ठाकरे सरकारने उचलले आहे.
अभिमन्यु काळे यांची तड़काफडकी बदली करण्यात आली आहे. परिमल सिंग यांच्याकडे आयुक्त पदाची सुत्रे देण्यात आली आहे. रेमडीसीवीर इंजेक्शन्स प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रेमडीसीवीर इंजेक्शन्स उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात आलेल्या अपयशामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
भाजपला 50 हजार रेमडेसीवीर इंजेक्शन पुरवठा करण्यासाठी ब्रुक फार्मा कंपनीने तयारी दर्शवली होती. परंतु, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी ब्रुक फार्माच्या संचालक राजेश डोकानिया चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन डोकानिया यांची सुटका केली होती.
'आम्ही लठ्ठ आहोत म्हणून...'; Body Shaming वर अक्षया नाईकची सणसणीत चपराक
या प्रकरणी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद पेटला होता. अखेर एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यावर कारवाई करण्याबाबत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
आजच्या कॅबिनेट बैठकीत अजित पवार, नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाडांनी याबद्दल मागणी केली होती. विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये विरोधी पक्षाचा हस्तक्षेप आणि एफडीए आयुक्त काळेंनी दिलेल्या पत्रावर कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केली होती.
अभिमन्यू काळे ह्यांच्या वर कारवाई केल्या बद्दल मुख्यमंत्री ह्यांचे आभार
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 20, 2021
अखेर या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिमन्यू काळे यांच्यावर कारवाई केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
काय आहे प्रकार?
'मुंबई पोलीसांकडे फार्मास्युटिकल कंपनीने मोठ्या प्रमाणात ( 60,000 कुप्या ) रेमडेसीवीर औषध साठवल्याची विशेष माहिती होती. भारत सरकारच्या रेमडेसीवीर या औषधाच्या निर्यातीवरील विद्यमान बंदीमुळे रेमडेसीवीर चा हा साठा निर्यात करता आला नाही. कोविड 19 पॉझिटिव्ह रूग्णांसाठी रेमडेसीवीर हे एक जीवनरक्षक औषध मानले जाते. विशेष माहितीनुसार, कारवाई करताना 17 एप्रिल रोजी फार्मास्युटिकल कंपनीच्या संचालकास बीकेसी पोलीस स्टेशनने चौकशीसाठी बोलावले होते. बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) पथक होते. एफडीएचे आयुक्त व सह आयुक्त यांनाही याची माहिती होती.
लग्नानंतर समजले नवरदेव आणि 2 वऱ्हाडी पॉझिटिव्ह, संपूर्ण गावात भीतीचं वातावरण
त्याच दिवशी रात्री विरोधी पक्षनेते (विधानसभा) देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते (विधान परिषद),प्रवीण दरेकर, आमदार पराग अळवणी आणि प्रसाद लाड यांनी बीकेसी पोलीस स्टेशनला भेट दिली. देवेंद्र फडणवीस यांनी फार्मास्युटिकल कंपनीच्या संचालकांना पोलीस स्टेशनमध्ये का बोलावले याची चौकशी केली. ते म्हणाले की, 'रेमडेसीवीर कुपींचा साठा महाराष्ट्र शासनास देण्यास एफडीए आयुक्तांकडुन परवानगी घेण्यात आली होती, कारण निर्यातीसाठी ठेवलेला रेमडेसीवीर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया किंवा 'एफडीआय यांच्या परवानगीशिवाय स्थानिक बाजारात वळविला जाऊ शकत नाही. एफडीएकडून फार्मास्युटिकल कंपनीला दिलेली माहिती बीकेसी पोलीस ठाण्यास कळविण्यात आली नाही, जे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीवर स्वतंत्रपणे वागत होते.
'मुंबई पोलिसांनी सद्भावनेने काम केले. तथ्यांद्रारे विशिष्ट माहितीच्या आधारावर जीवनरक्षक औषध रेमडेसीवीर ची मोठ्या प्रमाणात म्हणजेच 60,000 कुपी शोधून काढण्यासाठी औषधनिर्माण कंपनीच्या संचालकांना चौकशीसाठी बोलावले होते. रेमडेसीवीरच्या बेकायदेशीर होर्डिंग्ज, काळ्याबाजाराच्या तक्रारी आणि नागरिकांना होणारी टंचाई या तक्रारींच्या अनुषंगाने ही चौकशी आवश्यक होती.'
सदरची वस्तुस्थिती माननीय विरोधी पक्षनेते यांना समजावून सांगितली. बेकायदेशीरपणे रेमडेसीवीर होर्डिंग्ज लावणार्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांना देण्यात आली. नमुद ठिकाणी मुंबई पोलीसांचे वरिष्ठ अधिकारी हजर होते. फार्मास्युटिकल कंपनीच्या संचालकांकडे चौकशी करून त्यांना जाऊ देण्यात आले आणि नंतर जेव्हा जेव्हा त्यांना बोलावण्यात येईल तेव्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले, अशी माहितीही मुंबई पोलिसांकडून देण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.