मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण

तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण

या सुरक्षा रक्षकांवर आता उपचार सुरु आहेत. त्यांना कोरोनाची काही लक्षणं आढळल्याने त्यांची टेस्ट करण्यात आली होती.

या सुरक्षा रक्षकांवर आता उपचार सुरु आहेत. त्यांना कोरोनाची काही लक्षणं आढळल्याने त्यांची टेस्ट करण्यात आली होती.

या सुरक्षा रक्षकांवर आता उपचार सुरु आहेत. त्यांना कोरोनाची काही लक्षणं आढळल्याने त्यांची टेस्ट करण्यात आली होती.

    मुंबई 20 जुलै: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhv Thackeray) यांचे पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोना संसर्गाची लागण झालीय. हे दोन्ही सुरक्षा रक्षक आठवडाभरापूर्वी तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात होते. तेजस ठाकरेंचे यांची प्रकृती चांगली आहे. या सुरक्षा रक्षकांवर आता उपचार सुरु आहेत. त्यांना कोरोनाची काही लक्षणं आढळल्याने त्यांची टेस्ट करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह (Covide-19 test) आल्याने त्या दोघांवरही उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचीही तपासणी केली जाणार असल्याचीही माहितीही दिली जातेय. या आधीही मातोश्रीच्या परिसरात कोरोनाची लागण काही पोलिसांना झाली होती. तर खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून स्वत:च गाडी चालवत आपलं काम करत असून त्यांनी ड्रायव्हरला रजा दिली आहे. नेत्यांच्या सुरक्षेसाठी असलेले जवान आणि पोलिसांनाही कोरोना होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. सतत बाहेर राहावं लागत असल्याने सगळी काळजी घेऊन देखील कोरोनाची बाधा होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मुंबईत आता कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आणखी एका नेत्याला कोरोनाची बाधा, मुंबईच्या पालकमंत्र्यांचा अहवाल पॉझिटिव्ह दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या 24 तासांत तबब्ल 40 हजार 425 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वात जास्त आकडेवारी आहे. तर, 24 तासांत 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील कोरोना रुग्णांनी आता 11 लाखांचा आकडा पार केला आहे. सध्या देशात 11 लाख 18 हजार 43 कोरोना रुग्ण आहेत. ‘कोरोना’वर भारतात आणखी एका कंपनीने लाँच केलं औषध, किंमतही आहे कमी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 3 लाख 90 हजार 459 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 27 हजार 497 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 7 लाख 86 लोक निरोगीही झाले आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 1 कोटी 40 लाख 47 हजार 908 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. रविवारी देशात 2 लाख 56 हजार 39 चाचण्या करण्यात आल्या. तर, देशाचा रिकव्हरी रेट 62.9% झाला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या