Home /News /mumbai /

'...मग बघूच कोण सरस आहे', उद्धव ठाकरेंचं थेट अमित शहांना ओपन चॅलेंज

'...मग बघूच कोण सरस आहे', उद्धव ठाकरेंचं थेट अमित शहांना ओपन चॅलेंज

'मग बघू कोण सरस आहे, ते पाहून घेऊ. पण आव्हानं द्यायची आणि ईडीची पिडा लावायची, याला काही अर्थ नाही'

'मग बघू कोण सरस आहे, ते पाहून घेऊ. पण आव्हानं द्यायची आणि ईडीची पिडा लावायची, याला काही अर्थ नाही'

'मग बघू कोण सरस आहे, ते पाहून घेऊ. पण आव्हानं द्यायची आणि ईडीची पिडा लावायची, याला काही अर्थ नाही'

    मुंबई, 23 जानेवारी : 'आम्ही एकट्याने लढू विरासारखे लढू पण ही लढाई करत असताना तुम्ही तुमचे अधिकार वापरायचे नाही, आम्ही आमचे अधिकार वापरणार नाही. कार्यकर्ते-कार्यकर्ते म्हणून आणि पक्ष-पक्ष म्हणून लढा, मग बघू कोण सरस आहे' असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांचे चॅलेंज स्विकारत थेट आव्हान दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी थेट अमित शहांना आव्हान दिले आहे. 'मी पुन्हा पुन्हा सांगतो, मध्यंतरी ते अमित शहा पुण्यात येऊन गेले. एकट्याने लढण्याचे त्यांनी आवाहन केले. दसऱ्या मेळाव्यातच आम्ही आवाहन स्विकारलं होतं. आम्ही एकट्याने लढू विरासारखे लढू पण ही लढाई करत असताना तुम्ही तुमचे अधिकार वापरायचे नाही, आम्ही आमचे अधिकार वापरणार नाही. कार्यकर्ते-कार्यकर्ते म्हणून आणि पक्ष म्हणून लढा, मग बघू कोण सरस आहे, ते पाहून घेऊ. पण आव्हानं द्यायची आणि ईडीची पिडा लावायची, याला काही अर्थ नाही, याला शौर्य म्हटले जात नाही, बाळासाहेबांनी काय उत्तर दिले असते हे सर्वांना माहिती आहे' असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच, त्या काळजी वाहू विरोधकांना मी शिवसेनेच्या भगव्याचे तेज दाखवणार आहे.  भाजपला आम्ही पोसलं होतं. मागेही मी युती 25 वर्ष सडली होती. राजकारणाचे गजकरण लागले आहे. राजकारणासाठी ते काही ही खाजवत आहे' अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. 'भाजपचे हिंदूत्व हे बेगडी हिंदूत्व आहे. आम्ही भाजपला सोडलं हिंदुत्त्वाला सोडले नाही. कदापी सोडणार नाही. त्यांचे हिंदूत्व दिसतंय, आता सुद्धा आपल्यावर टीका करताना यांनी युती तोडली हा लोकशाहीचा अपमान आहे. पण आम्ही भाजपला सोडले असून हिंदूत्व सोडले नाही, असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Shivsena

    पुढील बातम्या