मुंबई, 28 जून : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (New Mumbai International Airport) दि. बा. पाटील यांचे नाव द्या, म्हणून संपूर्ण भूमिपुत्रांचे मोठमोठे आंदोलने (Agitation) झाली. मात्र, सिडकोमध्ये झालेल्या बाळासाहेबांच्या ठरावाला विरोध करतानाच शासनाला अनेक प्रकारे विनंती केल्या. मात्र, तरीही काही होऊ शकले नाही.
आता मात्र, एक मोठी बातमी समोर येत आहे. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर (Subhash Bhoir) यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. तसेच संबंधित विषयाकडे लक्ष घालावे आणि दि. बा. पाटील (D B Patil) यांच्या नावाला होकार द्यावा, अशी विनंती केली. तर सुभाष भोईर सुभाष भोईर यांच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी होकार दिल्याचे समजते.
काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे -
सर्व पक्ष कमिटी घेऊन या. आपण बैठक करू आणि त्यावर योग्य तो तोडगा काढू असा, संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुभाष भोईर यांच्याकडे दिला आल्याचे समजते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची उद्या पाच वाजता मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे. मीटिंग तर मुख्यमंत्र्यांना भेटण्याची निश्चित होईल आणि दि. बा. पाटील यांच्या नावाला दुजोरा मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेत भूकंप -
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि जवळपास 40 पेक्षा जास्त शिवसेना आमदारांना घेऊन ते मागील काही दिवसांपासुन आसामधील गुवाहटीत आहेत. सध्या शिवसेनेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट तयार झाले आहेत. दोन्ही गटांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नवी मुंबईतील या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मास्टरस्ट्रोक मारल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - ...म्हणून गुवाहाटीला निघून आलो, उदय सामंत अखेर बोलले
नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उरण या भागातील आगरी आणि कोळी समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं या विमानतळाच्या नामांतरासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, हे विमानतळ मुंबई विमानतळाचाच विस्तार असल्यामुळे त्याला शिवरायांचं नाव देणं योग्य राहिल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airport, Shivsena, Uddhav thackeray