राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातली भाषा उद्दाम, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातली भाषा उद्दाम, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

' सावरकरांना काँग्रेसने समलिंगी म्हटलं होतं. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी थोबाडीत मारली असती. कोणता दाखला देण्याची भाषा करताय?'

  • Share this:

अहमदनगर 13 ऑक्टोबर:  राज्यातली मंदिरं उघडण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यात वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनीही राज्यापालांना पत्र लिहून उत्तर देत चार खडे बोलही सुनावले आहेत. आता या वादावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला आहे. राज्यपालांना उत्तर देण्याची ही भाषा नाही. मुख्यमंत्र्यांच्या पत्रात अत्यंत उद्दाम भाषा वापरली आहे. उद्दाम भाषा संजय राऊत वापरतात अशी टीका त्यांनी केली.

पाटील म्हणाले, मंदिरं खुली करण्यासाठी नियमावली तयार करा आणि परवानगी द्या. त्यासाठीच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की राज्यपालांनी मला हिंदुत्व शिकवू नये. सावरकरांना काँग्रेसने समलिंगी म्हटलं होतं. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी थोबाडीत मारली असती. कोणता दाखला देण्याची भाषा करताय?

सर्वधर्मीयांना त्यांच्या प्रार्थनेसाठी त्यांच्या प्रार्थनास्थळी जायचंय. त्यामुळे परवानगी दिली पाहिजे. धर्मचार्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. राजाला अहंकार झाला तर साधू-संत त्याला त्याच्या गादीवरून खाली खेचतात असा इतिहास आहे.

आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरेंचे राज्यपालांना खरमरीत पत्र

कोर्टानं ठोकल्यावरच तुम्ही जागेवर येणार का? आजकाल प्रत्येक विषयात तुम्हाला कोर्ट ठोकतंय. राज्यपाल हे एक हिंदू नागरिक आहेत. त्यांना प्रत्येक विषयावर सूचना करण्याचा अधिकार आहे, भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे.  हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्ही जन्माला आलोय. करायची असेल तर आम्हाला अटक करा असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केला आहे. ते म्हणाले, यापुर्वी राज्यात मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी हमरीतुमरीवर येणं असं हे कधीच झाले नव्हतं. राज्यपालांच्या पत्राचा अर्थ समजून घेणं आवश्यक होतं. अहंकारातून सरकार चालवले जात आहे.

हिंदुत्वाच्या माध्यमातून आपल्याला निवडणुका जिंकता येतात हे शिवसेनाप्रमुखांनी दाखवून दिलं. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन धर्मनिरपेक्ष झालेत का याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं.

ठाकरे, तुम्ही कट्टर हिंदुत्व विचारांचे.., राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यपालांना धर्मनिरपेक्षता मान्य आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी विचारणे योग्य नाही. हिंदुत्वापेक्षा खुर्ची टिकवणे उद्धव ठाकरेंना महत्त्वाचे वाटतं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संयमपणीपणे उत्तर देणं आवश्यक होतं, मुद्यांना गुद्यांनी नाही तर मुद्यांनीच उत्तर देणं आवश्यक होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भांबावलेले आहेत अशी टीकाही दरेकर यांनी केली.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 13, 2020, 2:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading