मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन', मुख्यमंत्र्यांचा भाजपला थेट इशारा

'जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन', मुख्यमंत्र्यांचा भाजपला थेट इशारा

'ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का?'

'ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का?'

'ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का?'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 27 नोव्हेंबर : ' सध्या फक्त हात धुतोय; जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन. काहींना डोक्याचे विकार झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करावे लागतील. मराठी माणसाला गाडून त्यावर कुणाला नाचता येणार नाही. तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackery) यांनी भाजपला थेट इशाराच दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने दैनिक सामनामध्ये (saamana) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. एक संस्कृती आहे. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे आणि तुम्ही कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.

तसंच, 'तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू' असं थेट आव्हानच मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतला काही भाग जसेच्या तसे...

संजय राऊत -  उद्धवजी, या सरकारला एक वर्ष होतंय. या एक वर्षाचं पान उलटताना कसं वाटतंय आपल्याला?

मुख्यमंत्री – एक वर्ष या सरकारला पूर्ण होतंय. मी प्रामाणिकपणे सांगतोय, पण खरं म्हणजे मी शासन, प्रशासन या पठडीतला नाहीय. आमचं जे घराणं आहे ते सेवाव्रती आहे. महाराष्ट्राची सेवा करणारी आजची ही आमची सहावी पिढी आहे. आदित्यची पिढी बघितली तर आणि त्या पिढीवर एक संस्कार आहेत. सहज एक गंमत सांगत आता बोलता बोलता आठवलं, मी माझ्या आजीला म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या आईला कधी पाहिलं नाही. पण माझे आजोबा सांगायचे, अगदी बाळासाहेबही हे सांगायचे की, माझ्या आजीला असं वाटायचं की आपल्या मुलाने गव्हर्नमेंट सर्व्हंट व्हावं. माझ्या आजीच्या मुलाने म्हणजे शिवसेनाप्रमुखांनी गव्हर्नमेंट स्थापन केलं आणि तिचा नातू म्हणजे मी गव्हर्नमेंट चालवतोय. तर हा असा एक विलक्षण योगायोग असतो. परंतु सरकार बिरकार ठीक आहे. आम्ही जे आहोत ते सर्वांच्या समोर आहोत. पुनः पुन्हा त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. एका आव्हानात्मक परिस्थितीत मला ही मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. प्रशासनाचा अनुभव नाही, काही नाही. महापालिका अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे केवळ मुंबईचे महापौर निवडून आल्यानंतर त्यांचं अभिनंदन करायला मी महापालिकेच्या सभागृहात जात होतो.

संजय राऊत - आजही तीच ओरड सुरू आहे. हे सरकार अनैसर्गिक असल्याची…

मुख्यमंत्री – पण तसं जर असतं तर शिवाजी पार्कवर, शिवतीर्थावर तेव्हा कुणी फिरकलंही नसतं. साहजिकच आहे, हे सगळं घडवणं फार कठीण होतं. आपणही त्याचे साक्षीदार आहात. एक महत्त्वाचे घटक आहात. आघाडी करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत होते तेव्हा मुळातच काहीजणांना वाटत होतं की, हे तिन्ही पक्ष एकत्र येणारच नाहीत. काही जणांचा तसा कयास होता. त्यांना वाटत होतं शिवसेना आपल्या मागे फरफटतच येईल. शिवसेनेला आपल्याच मागे यावं लागेल. त्याशिवाय ती काहीच करू शकत नाही असा ज्यांचा समज होता तो आपण फोल ठरवला. यात नक्कीच काँग्रेस पक्षाची भूमिका महत्त्वाची… मग त्यात सोनियाजी आहेत. राष्ट्रवादीची भूमिकाही महत्त्वाची. मग शरद पवारजी आहेत. त्यांनीसुद्धा नाही म्हटलं तरी एक राजकीय धाडस दाखवलं आणि विश्वास दाखवला.

संजय राऊत  - आजही तीच ओरड सुरू आहे. हे सरकार अनैसर्गिक असल्याची…

मुख्यमंत्री – पण तसं जर असतं तर शिवाजी पार्कवर, शिवतीर्थावर तेव्हा कुणी फिरकलंही नसतं. साहजिकच आहे, हे सगळं घडवणं फार कठीण होतं. आपणही त्याचे साक्षीदार आहात. एक महत्त्वाचे घटक आहात. आघाडी करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत होते तेव्हा मुळातच काहीजणांना वाटत होतं की, हे तिन्ही पक्ष एकत्र येणारच नाहीत. काही जणांचा तसा कयास होता. त्यांना वाटत होतं शिवसेना आपल्या मागे फरफटतच येईल. शिवसेनेला आपल्याच मागे यावं लागेल. त्याशिवाय ती काहीच करू शकत नाही असा ज्यांचा समज होता तो आपण फोल ठरवला. यात नक्कीच काँग्रेस पक्षाची भूमिका महत्त्वाची मग त्यात सोनियाजी आहेत. राष्ट्रवादीची भूमिकाही महत्त्वाची. मग शरद पवारजी आहेत. त्यांनीसुद्धा नाही म्हटलं तरी एक राजकीय धाडस दाखवलं आणि विश्वास दाखवला.

संजय राऊत - ईडीसारख्या संस्था… ज्या केंद्र सरकारच्या हातात आहेत. त्या संस्थांचा वापर महाविकास आघाडीच्या आमदारांवर धाडी घालून दहशतवाद आणि दडपशाही करताहेत. जेणेकरून आमदारांनी गुडघे टेकावेत.

मुख्यमंत्री – मला जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. एक गोष्ट काही लोक विसरतात की, तुम्ही जो म्हणालात तो चमत्कार या महाराष्ट्राच्या मातीत आहे. तेज आहे. महाराष्ट्रावर अनेक संकटं आली. आपत्त्या आल्या. भलेभले अंगावर आले, पण काय झालं?

संजय राऊत - अंगावर येणाऱ्याना शिंगावर घेतलं…

मुख्यमंत्री – माझ्या दसऱ्याच्या भाषणात मी तेच बोललो होतो. माझ्या आजोबांच्या पहिल्या मेळाव्याच्या भाषणाचा संदर्भ दिला होता की, महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. वाघाची अवलाद आहे. महाराष्ट्राच्या वाटेला कुणी जाईल किंबहुना महाराष्ट्राला कोणी डिवचेल तर काय होतं याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील आणि अशी ही संकटं अंगावर घेत पचवून त्यांचा खात्मा करत महाराष्ट्र पुढे जात राहिला, महाराष्ट्र कधी थांबला नाही. महाराष्ट्र कधी थांबणार नाही. कुणी किती आडवे आले तरी त्या आडवे येणाऱयांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल. म्हणून महाराष्ट्राला आव्हानं देणाऱयांना माझं म्हणणं आहे की, अशी आव्हानं देऊन तुम्ही सूडचक्र करणार असाल तर सूडचक्रात आम्हाला जायची इच्छा नाही. पण तुम्ही तशी वेळ आणलीतच तर तुम्ही आम्हाला म्हणता ना हिंदुत्ववादी तर मग ठीक आहे. सूडचक्र तुमच्याकडे, आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. आमच्याकडे पण चक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो.

संजय राऊत - संपूर्ण देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय…

मुख्यमंत्री – होतोच आहे.

संजय राऊत - सध्या तर पूर्णपणे उघडपणे आणि निर्लज्जपणे तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. महाराष्ट्रातही अघोरी प्रयोग सुरू झाले आहेत.

मुख्यमंत्री – हो. खरं आहे. माझं या सगळय़ा घडामोडींवर लक्ष आहे. मी मागेही म्हटलं होतं की मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. एक संस्पृती आहे. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्पृती आहे आणि तुम्ही कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यां कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो.

संजय राऊत - या सगळ्यांचा सरकार प्रतिकार करेल?

मुख्यमंत्री – सरकार काय, अख्खा महाराष्ट्र करेल. कारण महाराष्ट्रात हा असला विचार कधीच रुजलेला नाहीच. सूडाचा विचार… शत्रूला पराभूत करणं हा आहे. पण या पद्धतीने कारण नसतान राजकीय शत्रूचा काटा काढणं ही संस्पृती नाही.

संजय राऊत - अशा प्रकारचा प्रतिकार ममता बॅनर्जी यांनी फार ताकदीने केला होता.

मुख्यमंत्री – करणार ना. बंगाल आहेच. कारण बंगाल आणि महाराष्ट्राला क्रांतिकारकांची एक परंपरा आहे. त्यामुळे क्रांती आणि पराक्रम या मातीतच जन्माला येतो. महाराष्ट्राला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र का म्हणतो! कारण त्यांनी तुमचं स्वराज्य नाही स्थापन केलं, तर अन्याय, किंबहुना हे उपरे जे अंगावर येतात, आक्रमक त्यांचा फडशा कसा पाडायचा ती शक्ती आणि प्रेरणा आपल्याला दिलेली आहे. म्हणून माझं म्हणणं असंच आहे की, राजकारण राजकारणासारखं करा. त्यात तुम्ही केवळ सत्तेचा दुरुपयोग करून अंगावर येणार असाल तर सत्ता सदासर्वकाळ कोणाकडे राहत नाही. मागे त्यांच्याहीबद्दल कसं सगळं चाललं होतं आणि त्याही केसेस कशा होत्या, काय होत्या हे आठवत असेलच. त्यावेळेला शिवसेनाप्रमुखांनी कसं त्यांना वाचवलं होतं याचं थोडं जरी भान त्यांना असेल, तर काळ कसा बदलू शकतो आणि याही काळामध्ये सत्ता ही केवळ खुर्चीत बसलो असलो म्हणून नाही तर जनता ही मोठी ताकद आहे आणि खरी सत्ता ती असते. ती आमच्यासोबत आहे.

संजय राऊत - पण ईडीचा वापर होतोय. सीबीआयचाही सुरू होता. आता आपण सीबीआयला वेसण घातली.

मुख्यमंत्री – का घातली. तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू.

संजय राऊत - हा जो मसाला आपल्याकडे आहे त्याला फोडणी कधी देणार?

मुख्यमंत्री – म्हणून मी म्हटलं ना की, सूडाने वागायचंच आहे का? माझी आजही प्रामाणिक इच्छा आहे की, हे असं विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका. कारण विकृती ही विकृती असते. त्या मार्गाने जायची आमची आज तरी इच्छा नाही. आम्हाला भाग

पाडू नका.

संजय राऊत - हे राज्य नीट चालू नये अशा प्रकारची धोरणं आणि भूमिका केंद्राकडून घेतली जात आहेत. या परिस्थितीत महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार?

मुख्यमंत्री –  महाराष्ट्र ठामपणाने एक एक पाऊल पुढे टाकत चालला आहे. केंद्र आणि राज्याविषयी तुम्ही म्हणताय ठीक आहे, पण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की, माणुसकी मरता कामा नये. ठीक आहे कोणी आज पंतप्रधान असेल. उद्या दुसरा असेल. पुणी आज मुख्यमंत्री आहे. उद्या दुसरा असेल. पण आपण मुळात इथे का बसलो आहे. इकडे पक्षाभेद विसरून तुम्ही काम करणं अपेक्षित आहे. तुम्ही शपथ घेता ना… सर्वांना समान न्याय तुम्ही दिला पाहिजे. तो जर न देता तुम्ही त्याच्यात पक्षपात करत असाल तर मात्र तुम्ही त्या खुर्चीत बसायच्या लायकीचे नाहीत. मग मला असं वाटतं की, या अत्यंत कठीण काळात महाराष्ट्राने जे काही काम केले आहे ते या 28 तारखेला आम्ही जनतेसमोर ठेवतो आहोत. नाही म्हटलं तरी एक पुस्तकच झालेलं आहे.

First published: