मुंबई, 13 जुलै : महाविकास आघाडी सरकारमध्ये (mva governmet) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी स्वबळाचा नारा देऊन एकच चर्चेचा धुरळा उडवून दिला होता. तर 'कोरोनाची भीती बाळगू नका, बाळासाहेब, आम्हीही स्वबळावर येऊ, स्वबळावर म्हणजे चालत येऊ' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या स्वबळावर भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या टोलेबाजीमुळे सभागृहात एकच हशा पिकली.
मुंबईमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्कार (Dr. Shankarrao Chavan Jalbhushan Award) सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar), जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil), अशोक चव्हाण (asok chavan), पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांच्या उपस्थितीत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावरून चांगलाच खोचक टोला लगावला.
'माझी कारकीर्द सर्वांसमोर आहे. विरोधक यांनी जे केलं ते सर्वच वाईट अशी माझी भूमिका कधी नव्हती. पण, या काळात अनेक शोध लागत आहेत, पण पाण्याचा शोध नाही लागला. जे पाणी आहे ते नियोजन महत्त्वाचे आहे. प्रत्येक मंत्र्यांनी जनतेला काही ना काही दिलं पाहिजे, 25 वर्षानंतर महाविकास आघाडीचे नाव लक्षात राहिलं पाहिजे', असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांना दिला.
तसंच, स्वबळाच्या नारेबाजीवरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व्यासपीठावरून टोला लगावला. 'आता जेवणाचा विषय निघाला चांगलं झालं, कोरोनाची भीती बाळगू नका बाळासाहेब, आम्ही सुद्धा स्वबळावर येणार, स्वबळावर म्हणजे आम्ही स्वतः चालत येऊ, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहत नाना पटोले यांना टोला लगावला.
तर आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जोरदार बॅटिंग केली. 'महाविकास आघाडी स्थापन झाली तेंव्हा एकोपा निर्माण व्हावा यासाठी नवा पायंडा पाडला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांना एकत्र जेवणं दिलं. मग मी सर्वांना एकत्र जेवण दिलं. पण, मी आता अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या निमंत्रणाची वाट बघतोय' असं अजितदादा म्हणताच सभागृहात एकच हशा पिकली.
अजित पवारांनी निमंत्रणाचं विचारताच, यावेळी लगेच अशोक चव्हाण म्हणाले की, 'अहो, कोरोना आहे सध्या' असं म्हणताच सभागृहात पुन्हा एकच हशा आणि टाळ्या पडल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.