मुंबई, 27 जुलै : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज आज साठावा वाढदिवस आहे. राज्य कोरोना सारख्या संकटाचा मुकाबला करत असल्यामुळे उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाही असे जाहीर केले आहे. तसंच, त्यांनी कार्यकर्त्यांना एक महत्त्वाची सूचनाही केली आहे.
आज वाढदिवसाच्या दिवशी उद्धव ठाकरे हे 'मातोश्री'वर पहिल्या मजल्यावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतील त्यांच्या स्मृतींना उद्धव ठाकरे वंदन करतील. त्यानंतर ठाकरे कुटुंबातील महिला सकाळी उद्धव ठाकरेंचे औक्षण करणार आहेत.
फक्त बोलत नाही करुन दाखवतो; शेतात राबणाऱ्या मुलींसाठी सोनूने पाठवला ट्रॅ्क्टर
राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. बॅनर, होर्डिंग न लावण्याची सूचनाही केली आहे.
तसंच, या वर्षी शिवसैनिकांनी 'मातोश्री'वर शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये, असे आदेश उद्धव ठाकरेंनीच दिले आहे. त्या ऐवजी सर्व शिवसैनिकांनी कोरोनाचा सक्षम मुकाबला करण्यासाठी रक्तदान शिबीर, प्लाझ्मादान शिबीर आयोजित करावे, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं.
पंढरपूर भाजप शहराध्यक्ष संजय वाईकर यांचा कोरोनामुळे मृत्यू
तसंच कोरोनाबाधित रुग्णांसाठी जी काही मदत करता येईल ती मदत करावी, असंही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना सांगितलं आहे.
अजित पवारांकडून अनोख्या शुभेच्छा
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देत एक फोटो ट्वीट करून सूचक इशारा दिला आहे.
सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्ष जरी असले तरी स्टिअरिंग हे माझ्याच हातात आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांनी गाडीची स्टिअरिंग आपल्या हातात असल्याचा इशारा केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच गाडीत बसले आहेत आणि या गाडीचं स्टिअरिंग अजित पवारांच्या हातात आहे.
पंतप्रधान मोदी कोरोनासाठी 3 राज्यात करणार अत्यधुनिक लॅबचं अनावरण
या अनोख्या शुभेच्छांमुळे पुन्हा एकदा स्टिअरिंग नक्की कुणाच्या हातात आहे? अशी दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.