• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी कोकण दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी कोकण दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौरा निश्चित करण्यात आला आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 मे: तौक्ते चक्रीवादळाने  (cyclone tauktae) समुद्रकिनारी भागात धुमाकूळ घातला होता. कोकणात अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आता नेत्यांनी भाऊ गर्दी केली आहे. आता  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackery)  सुद्धा कोकणातील (kokan) नुकसानग्रस्त भागाची शुक्रवारी पाहणी करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौरा निश्चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री  ठाकरे शुक्रवारी चक्रिवादळग्रस्तं सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा पाहणी दौरा करणार आहे. आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्यात कोणकोणत्या भागात किती नुकसान झाले आहे. याची चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर काय मदत जाहीर करायची याबद्दलही चर्चा झाली. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश आधीच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. आता खुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. 'आम्ही प्रत्येक चित्रपटासाठी ऑडिशन देतो...',स्टार किड्सवर भडकली मल्लिका शेरावत मागील वर्षी सुद्धा निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर ठीक वर्षभरानंतरच पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोकणात जाणार आहे. 'पंतप्रधान साहेब, खतांच्या किमती कमी करा' प्रीतम मुंडेंच थेट मोदींना पत्र दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आजपासून तीन दिवस चक्रीवादळाचा फटका बसलेल्या तीन जिल्ह्यात दौरा सुरू झाला आहे. तर राज्य सरकारच्या वतीने देखील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार या जिल्ह्यात उद्या दौरा करणार आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व नुकसानग्रस्त यांना तातडीने मदत मिळण्यासाठी विजय वडेट्टीवार मंत्री आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन हे दिनांक 20 ते 23 मे चार दिवस कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या गुरुवारला ताम्हणी, मानगड, मसळा, श्रीवर्धन, शुक्रवारला रत्नागिरी जिल्हा, शनिवारला सिंधुदुर्ग जिल्हा, रविवारला पालघर व ठाणे जिल्ह्यात पाहणी करून आढावा बैठक घेणार आहेत.
  Published by:sachin Salve
  First published: