Home /News /mumbai /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 8 वाजता जनतेशी साधणार संवाद, मोठ्या घोषणेची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 8 वाजता जनतेशी साधणार संवाद, मोठ्या घोषणेची शक्यता

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8 वाजता सोशल मीडियावरून राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8 वाजता सोशल मीडियावरून राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8 वाजता सोशल मीडियावरून राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत.

  मुंबई, 08 ऑगस्ट : राज्यात कोरोनाची लाट (Corona Virus) ओसरल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहे. मात्र, पुणे आणि काही जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी निर्बंध शिथिल करण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रविवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता सोशल मीडियावरून राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यातील निर्बंध शिथिल करण्याची शक्यता आहे. तसंच, मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी सुरू करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रेस्टाँरंट सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबईतील मॉल पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या रस्त्यांची चाळण हे आहेत खड्डेमय रस्त्यांची यादी दरम्यान, राज्य सरकारनं 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले. मात्र पुढील दोन महिने धोक्याचे असल्याचं मत राज्याच्या टास्क फोर्सनं (Task Force) व्यक्त केलं आहे. अशातच उद्या कोविड टास्क फोर्सची बैठक (Meeting) होणार आहे.

  राष्ट्रवादी काँग्रेसचा 'हा' बडा नेता गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात

  या बैठकीत मुंबई लोकल सुरू करण्यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे. सामान्य मुंबईकरांना लोकल ट्रेन मधून प्रवास करायला मिळणार का याकडे सगळ्यांच लक्ष आहे. दोन लस डोस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवास मुभा द्यावी ही मागणी केली जात आहे. त्यामुळे टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हॉटेल व्यावसायिकांना देखील वेळ वाढवून हवी आहे. राज्यातील कोरोना रुग्ण संख्या आणि विविध भागात काय सूट दिली जाऊ शकते याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे उद्या होणार टास्क फोर्सची बैठक महत्वाची असेल.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या