...तर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल - संजय राऊत

...तर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल - संजय राऊत

फडणवीस हे राज्यपालांना वारंवार भेटतात त्यापेक्षा त्यांनी मुख्यमंत्री व शरद पवार यांना भेटून कोरोना संकटावर चर्चा केली पाहिजे. ते का होत नाही?

  • Share this:

मुंबई, 24 मे :  'महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात ‘कोरोना’ लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंड पाहिलेले नाही.

मंत्रालय, सरकारी कचेऱ्यातील शांतता एक प्रकारची हतबलताच दाखवीत आहे. हे असेच राहिले तर कामगार कपातीप्रमाणे ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल' असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. तसंच त्यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे. परंतु, यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर बोट ठेवलं आहे. 'महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात ‘कोरोना’ लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंड पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी त्यांची सध्याची अवस्था आहे. जे मलईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. मंत्रालय, सरकारी कचेऱ्यातील शांतता एक प्रकारची हतबलताच दाखवीत आहे. हे असेच राहिले तर कामगार कपातीप्रमाणे ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल' असं राऊत म्हणाले.

फडणवीसांना टोला

शरद पवार यांनी एक पत्र पंतप्रधान मोदी यांना पाठवले आहे. त्यात शेतकऱ्यांना मदत करण्याविषयी सुचवले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस यावर भडकले. पवारांनी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहावे असा त्रागा त्यांनी केला. पवारांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले हा त्यांचा अनुभव. मग विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीस यांना आपल्याच पंतप्रधानांना पत्र लिहिण्यापासून कोणी रोखले? फडणवीस व त्यांचे सहकारी राज्यपाल, पंतप्रधानांशी बोलतात ते फक्त सरकारच्या अपयशाबाबत. राज्य सरकार बरखास्त करा हाच त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे.

हेही वाचा - पैसे नाही म्हणून अंगणात पुरला भावाचा मृतदेह, शेजाऱ्यांना सांगितलं धक्कादायक कारण

विरोधी पक्षाने बदलत्या संदर्भात थोडे सबुरीने घेतले तर त्यांचे संकटही दूर होईल. त्यांचे ‘लॉकडाउन’ही संपेल. आज समाज माध्यमांवर सर्वाधिक टवाळी विरोधी पक्षाचीच सुरू आहे. हे चित्र बरे नाही. फडणवीस हे राज्यपालांना वारंवार भेटतात त्यापेक्षा त्यांनी मुख्यमंत्री व शरद पवार यांना भेटून कोरोना संकटावर चर्चा केली पाहिजे. ते का होत नाही? असा टोलाही राऊतांनी फडणवीसांना लगावला.

'विरोधी पक्षाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम'

'वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातूनच काम करावे आणि सुरक्षित राहावे हा विचार वाढतो आहे. घरातून काम करणाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल असा इशारा ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला यांनी दिला आहे. तो खरा मानला तर ‘कोरोना’ काळात राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला हे जाणवू लागले आहे. लोकांनी विरोधकांना घरी बसवले व संकटकाळात ते सरकारविरोधात काम करीत आहेत' असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला.

सरकार त्यांच्या घराचे मालक कधी झाले?

महाराष्ट्रातले ‘ठाकरे सरकार’ कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरल्याची घंटागाडी वाजवत महाराष्ट्राचा विरोधी पक्ष पुनः पुन्हा राजभवनाची पायरी चढतो आहे, आंदोलनं करतो आहे. अपयशाचे म्हणायचे तर मग कोरोनाच्या बाबतीत सगळ्यात अपयशी राज्य म्हणून उत्तर प्रदेश आणि गुजरातकडे पाहावे लागेल. पंतप्रधान म्हणून मोदी व गृहमंत्री म्हणून अमित शहांची येथे जबाबदारी येतेच. महाराष्ट्रात संकट आहेच.

हेही वाचा - भाजपविरुद्ध भाजप! खासदार पुत्रांकडून कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण

तसे ते इतरत्रही आहे व सगळे एकाच बोटीतून प्रवास करीत आहेत. कर्नाटकचे सरकारही इतर राज्यांतील कानडी बांधवांना आपल्या राज्यात येऊ देत नाही. कोरोनाशी लढण्याचा हाच एकमेव उपाय आहे काय? लोकं दारात उभी आहेत. गाव आणि घर त्यांचंच आहे. सरकार त्यांच्या घराचे मालक कधी झाले?' असा सवालही राऊतांनी उपस्थितीत केला.

First published: May 24, 2020, 9:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading