CM उद्धव ठाकरे 8 वाजता संवाद साधणार, मजुरांच्या प्रश्नावरून केंद्र आणि राज्यात पडणार ठिणगी

CM उद्धव ठाकरे 8 वाजता संवाद साधणार, मजुरांच्या प्रश्नावरून केंद्र आणि राज्यात पडणार ठिणगी

अडकलेल्या मजुरांसाठी केंद्राने धोरण जाहीर करावं अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

  • Share this:

मुंबई 14 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8 वाजता पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहे. राज्यात लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढविण्यात येईल असं त्यांनी या आधीच सांगितलं होतं. लॉकडाऊन वाढत असल्याने अडकून पडलेल्या कामगारांचा धीर सुटला आहे. ब्रांद्यात त्यांनी आज मोठ्या संख्येने एकत्र येत तीव्र विरोध नोंदवला. तर आदित्य ठाकरे यांनी केंद्रावर निशाणा साधत अडकलेल्या मजुरांसाठी केंद्राने धोरण जाहीर करावं असं म्हटलं आहे. तर या मजुरांसाठी सरकारने कुठलीही व्यवस्था केली नाही अशी टीका भाजपच्या नेत्यांनी केलीय.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केलीय,  बांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे.  हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. तशी व्यवस्था होत नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही निदर्शनास आणून देत आहोत. तरीही राज्य सरकारने तसे उपाय केलेले नाहीत.

आजच्या घटनेतून तरी राज्य सरकारने धडा घ्यायला हवा आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी.

अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेच लढावा लागेल, ही पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

माजी खासदार संजय निरुपम यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. ते म्हणाले, वांद्रे येथे जे झाले ते होणारच होते, त्यांना खायला मिळत नाही, मूळ गावी जावू दिले जात नाही, किती दिवस ते शांत राहणार. मोफत खायला देतो असं फक्त सरकारी आकडे दाखवतात. कोणतेही सरकार किती दिवस मोफत देणार, किती दिवस त्यांना थांबवणार, दुसरा काही पर्याय नाही का? असा सवाल केलाय.

आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, आज जे वांद्रेमध्ये दिसले ते उद्या मुंबई मध्ये राहणारे कोकणातले लोक पण असु शकतात. सरकार त्यांना आप आपल्या गावी जाऊ नका अस सांगत आहे पण मुंबई मधल्या 10 बाय 10 च्या खोलीत त्यांना धान्य तरी सरकार नी द्यावे नाही तर त्यांचा ही असाच उद्रेक होईल. मुख्यमंत्री सतत बोलत आहे जिथे आहात तिथेच रहा सरकार तुमची काळजी घेईल. पण असं होत नाही आहे म्हणुनच उद्रेक होत आहे.

आज लॉकडाऊन संपेल या आशेने मुंबईमध्ये राहणारे हजारो मजूर गावी जाण्यासाठी वांद्रे पश्चिम याठिकाणी आले होते. लॉकडाऊ वाढवल्यामुळे या मजुरांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे मजुरांनी कोरोनाचं गांभीर्य लक्षात न घेता रस्त्यावर उतरण्याता निर्णय घेतला. या ठिकाणी वाढलेल्या गर्दीमुळे मोठा गोंधळ झाला आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. सध्या ही परिस्थिती आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

Tags:
First Published: Apr 14, 2020 07:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading