• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत पोहोचले HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये, कारण आले समोर!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत पोहोचले HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये, कारण आले समोर!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमी रुटीन चेकअपसाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये जात असतात, पण आज...

 • Share this:
  मुंबई, 29 जून: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) आज सकाळी अचानक दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये (HN reliance hospital Mumbai) दाखल झाले होते. सुरुवातीला ते कशासाठी दाखल झाले याबद्दल माहिती देण्यात आली होती. मात्र,रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये आले होते, असं सांगण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून फक्त रुटीन चेकअपसाठी आले होते, असं सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी स्वत: कार चालवत दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. उद्धव ठाकरे हे आपल्या शासकीय वर्षा निवासस्थानी होते. तिथूनच एचएन रिलायन्स हॉस्पिटल हे जवळ असल्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे गाडी चालवत रुग्णालयात पोहोचले. भरधाव कारनं फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडलं; थरारक घटनेचा LIVE VIDEO मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमी रुटीन चेकअपसाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये जात असतात, पण आज उद्धव ठाकरे एचएन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. याआधीही रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं इस्त्रायल दूतावासाने केलं अभिनंदन दरम्यान, मुंबईकरांची (Mumbai) तहाण भागवण्यासाठी आता समुद्राचे पाणी गोड होणार आहे. इस्ज्ञायली तंत्रज्ञानाद्वारे समुद्राचे पाणी गोड केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाचं इस्त्रायली सरकारच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे. मुंबईतील इस्रायलच्या दूतावासाने खास मराठीतून ट्वीट करून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाण्याचे, पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्त्व ओळखून मुंबईला निक्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन. जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे' असं ट्वीट इस्त्रायलच्या दूतावासाकडून करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्यासाठी प्रकल्प अहवालासाठी मुंबई पालिका आणि इस्रायलच्या IDETechnologies यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प हे क्रांतिकारी पाऊल असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
  Published by:sachin Salve
  First published: