मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोना लस

मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोना लस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री यांनाही कोरोनाची लस देण्यात आली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री यांनाही कोरोनाची लस देण्यात आली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री यांनाही कोरोनाची लस देण्यात आली

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 11 मार्च : कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहिम (corona vaccine) सुरू आहे. कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी कोरोनाची लस घेतली आहे. मुंबईतील जेजे रुग्णालयात (JJ Hospital) मुख्यमंत्री ठाकरे यांनी सहकुटुंब लस घेतली आहे.

मुंबईतल्या जे जे हाँस्पिटलमध्ये ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोव्हॅक्सिन लस घेण्यात आली आह. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री अशा तीन जणांना लस देण्यात आली आहे. याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कुटुंबासह कोविडशिल्ड लस घेतली आहे.

'शरद पवार आणि त्यांच्या पत्नी यांनी सिरम इंस्टिट्यूटची कोविशिल्ड लस घेतली. त्यानंतर त्यांना 30 मिनिटं निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. दुसरी लस 28 दिवसांनी दिली जाईल.

काँग्रेस नगरसेवकाच्या घरातून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त, तस्करीचा आरोप

60 वर्षांपुढच्या नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम 1 मार्चपासून सुरू झाली आहे. ज्यांना इतर काही मोठे आजार आहेत अशा 45 च्या पुढच्या नागरिकांनाही या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यासाठीचं रजिस्ट्रेशन CoWin पोर्टलवर सुरू झालं आहे.

या टप्प्यात 60 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. सोबतच 45 वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचंही या टप्प्यात लसीकरण दिलं जाणार आहे. आता सरकारी रुग्णालयांसोबतच काही खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 

First published:

Tags: उद्धव ठाकरे