मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोनाचा धोका कायम, राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका- मुख्यमंत्र्यांचा इशारा

कोरोनाचा धोका कायम, राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका- मुख्यमंत्र्यांचा इशारा

मास्क वापरा, वारंवार हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, या तीन गोष्टींमुळेच कोरोनाचा प्रसार रोखता येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मास्क वापरा, वारंवार हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, या तीन गोष्टींमुळेच कोरोनाचा प्रसार रोखता येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मास्क वापरा, वारंवार हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, या तीन गोष्टींमुळेच कोरोनाचा प्रसार रोखता येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

  • Published by:  Ajay Kautikwar

मुंबई 22 नोव्हेंबर: दिवाळीनंतर कोरोना (Covid-19)रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रविवारी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांनी खूप सहकार्य केलं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ज्या धीराने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबवली त्याचं त्यांनी कौतुक केलं. रुग्ण संख्या आटोक्यात असली तरी धोका टळलेला नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोनाची दुसरी लाट ही लाटच नसून ती त्सुनामी असेल असा इशारीही त्यांनी दिला.

राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येवू नये असंही ते म्हणाले. आत्ताच कोरोनाचा अटकाव करा असंही ते म्हणाले. राज्यात हे उघडा ते उघडा अशी मागणी करणारे कोरोना वाढला तर जबाबदारी घेणार का? असा सवाल करत त्यांनी भाजपवर टीका केली.

त्यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणा करू नये असं आवाहनही त्यांनी केली. महाराष्ट्रात रात्रीचा कर्फ्यू लागू करा असं म्हणतात पण महाराष्टात आम्ही ठरवलेलं नाही. लोकांनीच नियम पाळावे असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आहे. काही राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबात अजुनही काही ठरविण्यात आलेलं नाही असेही त्यांनी सांगितलं. मंदिरं उघडली मात्र तिथे गर्दी करू नका. अनावश्यक नसेल तिथे गर्दी करू नका. लक्षणे दिसत असेल तर लगेच चाचणी करून घ्या असंही ते म्हणाले.मास्क वापरा, वारंवार हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असंही ते म्हणाले.

...तर मुंबई महापालिकेवर भाजप-आरपीआयचा झेंडा फडकेल; रामदास आठवलेंचा विश्वास

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आज बऱ्याच दिवसांनी बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात 5 हजार 753 रुग्ण आढळले आहेत. तर 4 हजार 60 रुग्णांना बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले. राज्याचा Recovery Rate 92.75 एवढा झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाख 51 हजार 64 एवढी झालीय. राज्यात मृत्यूत आज घट दिसून आली. गेल्या 24 तासांमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 17 लाख 80 हजार 208 एवढी झाली आहे.

उद्धव ठाकरेंबद्दल शिवसेनेच्या मंत्र्याने केलेल्या गौप्यस्फोटामुळे खळबळ

रुग्ण संख्या वाढत असल्याने सरकारही कामाला लागलं असून चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हा स्तरावरही सर्व आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Coronavirus