Home /News /mumbai /

युती तर तुम्ही 2014 मध्येच तोडली होती, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

युती तर तुम्ही 2014 मध्येच तोडली होती, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत दिलेला शब्द खोटा ठरवण्यात आला... मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. प्राण गेला तरी बेहत्तर पण मी शिवसैनिकांशी खोटं बोलणार नाही. आमचा अतरंग भगवाच आहे.

  मुंबई, 23 जानेवारी: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा 11 ज्येष्ठ शिवसैनिकांनी जाहीर सत्कार केला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी वेगळा मार्ग स्वीकारला. पण आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही. आमचं अंतरंग भगवंच आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. युती तर तुम्ही 2014 मध्येच तोडली होती.. उद्धव ठाकरे म्हणाले, 2014 मध्ये तुम्ही अदृश्य हातांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केलाच होता. मी जी जबाबदारी स्वीकारली होती ती माझ्या स्वप्नातही नव्हती. शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला अशी टीका झाली. मात्र मला आज भाजपाला विचारायचं आहे की तुमचं काय काय उघड झालं? युती तर तुम्ही 2014 लाच तोडली होती आणि आज आम्हाला नावं ठेवत आहात का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे... - हिंदू भगिनी मातांनो अशी सुरूवात केली... - मला सर्व जून्या २३ जानेवारी आठवतायेत... - हा माझा नाही तर तुमचा सर्वांचा सत्कार आहे - जी जबाबदारी मिळेल त्यातून कधीही मी पळ काढलेला नाही. - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत दिलेला शब्द खोटा ठरवण्यात आला... मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. प्राण गेला तरी बेहत्तर पण मी शिवसैनिकांशी खोटं बोलणार नाही. आमचा अतरंग भगवाच आहे. - हा सत्कार माझा नव्हे तर तुमचा - जी जबाबदारी आली त्यापासून पळ काढला नाही - वचनपुर्तीच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे - भाजपनं सेना प्रमुखांच्या खाेलीत दिलेले वचन माेडले - मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे - कधीही खाेटे बाेलणार नाही, प्राण गेले तरी - ना रंग बदलला ना अंतरंग, आमचा भगवा कायम आहे. - 2014 साली ही युती तोडलेली होती. आमचा चेहरा उघड झालेला असेल पण तुम्ही तर अख्ये उघडे पडलेले आहात. - मी माझं मुख्यमंत्री पद ज्यांनी आज पर्यंत शिवसेनेसाठी खस्ता खाल्या... प्राण दिलेत... त्यांना मी अर्पण करतो. - शिवसैनिक हेच आमचे सुरक्षा कवच आहे. - जो विश्वास तुम्ही आमच्या कुुटुंबावर दाखवत आलात त्यासाठी - आमचा चेहरा उघडा झालाय, पण तुम्ही अख्खे उघडे झालात. - मी मुख्यमंत्री हाेईन असं वचन मी बाळासाहेबांना दिलं नव्हतं. - ज्यांनी शिवसेना मोठी केला त्यांना मुख्यमंत्रीपद अर्पण करतो. - घरातूनही वारं करण्याचे प्रयत्न झाले, पण तुमच्या सुरक्षा कवचामुळं काही झालं नाही

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sandip Parolekar
  First published:

  Tags: Balasaheb thackeray, Uddhav thackeray

  पुढील बातम्या