Home /News /mumbai /

'स्वत:ला बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखं वाटतं, केमिकल लोच्चा झालाय', मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना खोचक टोला

'स्वत:ला बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखं वाटतं, केमिकल लोच्चा झालाय', मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना खोचक टोला

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रादेखील घेतला आहे. त्यांच्या याच भूमिकेवरुन उद्धव ठाकरे यांनी लगे रहो मुन्नाभाई चित्रपटाचा उल्लेख करत राज ठाकरेंवर टीका केली.

    मुंबई, 14 मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईच्या बीकेसी येथील मैदानात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रादेखील घेतला आहे. त्यांच्या याच भूमिकेवरुन उद्धव ठाकरे यांनी 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटाचा उल्लेख करत राज ठाकरेंवर टीका केली. यावेळी त्यांनी चित्रपटातील अभिनेता संजय दत्तच्या डोक्यात केमिकल लोच्चा झालाय तशी राज ठाकरेंची गत झाल्याची टीका केली. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? "मला एका शिवसैनिकाने सांगितलं, साहेब तुम्ही तो लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? म्हटलं लगे रहो मुन्नाभाईचा संबंध काय? मी म्हटलं हो थोडासा पाहिला आहे. का रे? म त्याच्यात नाही का संजय दत्तला गांधीजी दिसतात. तो त्यांच्याशी बोलतो. मी म्हटलं, मग? नाही म्हणे तशी एक केस आपल्याकडे आहे. म्हटलं कोणती केस? अहो तो नाही का ज्याला स्वत:ला बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखं वाटतं. शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली. कधी मराठीच्या नादात लागतात, तर कधी हिंदुत्वाच्या नादात लागतात", असं उद्धव ठाकरे म्हणाले. (आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांना साष्टांग दंडवत, भाषणात कार्यकर्त्यांचं कौतुक, म्हणाले....) "मी म्हटलं, अरे त्यातला मुन्नाभाई लोकांचं भलं तरी करत होता. हा कुठला मुन्नाभाई काढलास तू? नाही पण म्हणे एक लक्षात घ्या. कुणाला त्याच्या भ्रमात राहु द्याना. पण तुम्ही त्या चित्रपटाच्या शेवट नाही बघितला म्हणे. म्हटलं काय? शेवटी संजय दत्तला कळतं की साला अपून के भेजेमे केमिकल लोचा होएला है. तर ही केमिकल लोचाची केस आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. हे असे मुन्नाभाई फिरत आहेत तर फिरु देत. आता कुणाला अयोध्याला जायचंय ते जाऊदे. आदित्यदेखील चालला आहे. गेल्या आठवड्यात तो तिरुपतीला गेला होता", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंची भाजप, औवेसी, राणा दाम्पत्यावरही टीका "संभाजीनगरमध्ये जे काही घडलं. हो मी संभाजीनगर म्हणतो. आहेच ते संभाजीनगर. तिकडे तो औवेसी गेला आणि औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं ठेवून आला. हे यांचं जे काही चाललं आहे, यांची ए, बी, सी टीम, कुणाला औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं, कुणाच्या हातामध्ये भोंगा द्यायचा, कुणाच्या हातामध्ये हनुमान चालीसा द्यायची आणि मजा भगायची. काय कारवाई झाली तर त्यांच्यावर होणार आम्ही बोंबलायला वेगळे. आम्ही जाणार टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. हे तुमचं शौर्य. बरं सुरक्षा किती? झेड प्लस", अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीका केली. 'आम्ही गाढवांना लाथ मारुन सोडलं' "नेमकं कशावर बोलायचं हा मुद्दा असला तरी हल्ली विशेषत: सर्व पक्ष त्यातही हिंदुत्वाचा खोटा बुर्खा घातलेला एक पक्ष आपल्यासोबत होता ते देशाची दिशा भरकवटत आहेत. मला आज मोठी गदा दिली. मी मध्ये एकदा बोललो होतो. आमचं हिंदूत्व कसं आहे ते शिवसेनाप्रमुखांनी शिकवलं आहे. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे. तोच धागा घेऊन आपण पुढे जात आहोत. आमचं हिंदूत्व हे गदाधारी आणि बाकीच्यांचं हिदूत्व हे गदाधारी आहे. बसा बडवत. काय मिळालं? घंटा! हे बघा तो गदा हलवतोय (प्रेक्षकांकडे बघून). अहो गदा पेलायला सुद्धा हातामध्ये ताकद पाहिजे. हनुमान, भीम! त्यामध्ये आपले देवेंद्र फडणवीस बोलले, अहो यांचं हिंदुत्व हे घंटाधारी नाही, गदाधारी आहे. म्हटलं बरोबर आहे. आमचं हिदुत्व हे गदाधारी होतं. पण ते अडीच वर्षांपूर्वी सोडलं. आमचे जे काही जुने फोटो तुमच्यासोबत येत आहेत त्याने तुमचा गैरसमज झाला असेल. आम्ही त्या गद्याला सोडून दिलं आहे. कारण त्याचा उपयोग नाही. शेवटी उपयोग काय त्याचा? गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. त्यामुळे जी गाढवं घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत होती त्या गाढवांनी लाथ मारण्याआधी आम्ही त्यांना लाथ मारुन बाहेर पडलो आहोत. आता बसा काय करायचंय ते", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या