आमच्या सरकारमध्ये कुठेही अडेलतटूपणा नाही, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सणसणीत टोला

आमच्या सरकारमध्ये कुठेही अडेलतटूपणा नाही, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सणसणीत टोला

'अनेक जणांना असं वाटत होते. हे सरकार होऊच शकणार नाही. आपल्या मागे फरफटत येणारच. पण शिवसेना कधी फरफटत जाणाऱ्या पक्षासारखी नव्हती, आधी नव्हती आणि आताही नसणार आहे'

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर : महाविकास आघाडी सरकारला  (maha vikas aghadi government)वर्षपूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने वर्षपूर्ती कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार मानत भाजपवर (BJP) टीका केली आहे.  'या सरकारमध्ये कुठे उगाच अडेलतटूपणा नाही, सर्वांची मानमर्यादा धरून काम पाहिले जात आहे. विषय उगाच लावून धरले जात नाही' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'महाराष्ट्र थांबला नाही. महाराष्ट्र थांबणार नाही.' पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली.

'मैदानातून येऊन टोलेबाजी करण्याचा वेगळा अनुभव आहे.  गेल्या वर्षभरामध्ये आमचं टीमवर्क झाले ते पाहता हे सर्व माझे सहकारी आहे. शासनातले आहे, प्रशासनातले आहे.  शरद पवार यांचे आशिर्वाद आमच्यावर आहे. अजूनही विश्वास बसत नाही. एक वर्ष पूर्ण झाले आहे. प्रत्यक्ष क्रिकेट पाहणे आणि मैदानात उतरून टोलेबाजी करणे हे वेगळं असतं. त्यासाठी टीम ही मजबूत असायला लागते. माझी टीम ही उत्तम आहे. सर्व जण अनुभवी आहे. सर्व जण छान काम करत आहे' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सर्व सहकार्यांचं कौतुक केलं.

'अनेक जणांना असं वाटत होते. हे सरकार होऊच शकणार नाही. आपल्या मागे फरफटत येणारच. पण शिवसेना कधी फरफटत जाणाऱ्या पक्षासारखी नव्हती, आधी नव्हती आणि आताही नसणार आहे' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

शरद पवार, सोनिया गांधी या सर्वांचे आशिर्वाद आहे. शरद पवार हे कधीच एका जागी थांबत नाही. बहुतेक लॉकडाउन लागला तेव्हा ते कदाचित घरी थांबले असतील.   शरद पवार यांच्या आयुष्यावर एखादे पुस्तक तयार करायला हवे, जे येणाऱ्या नवोदित राजकारण्यांना मार्गदर्शक ठरेल' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळली.

'सोनिया गांधी यांच्याशी एकदाच भेट झाली. बऱ्याच वेळा त्यांच्याशी फोनवर बोलणे होत असते. त्या नेहमी विचारता "सरकारचे चांगले काम सुरू आहे, आमची लोकं त्रास तर देत नाही ना", असं त्या खरंच विचारत असता. पण, मी तुमची (काँग्रेस नेत्यांची) बाजू त्यांच्याकडे लावून धरत असतो. निदान राष्ट्रवादीपेक्षा जास्त सहकार्य हे तुम्ही करता' असं उद्धव ठाकरे म्हणताच सभागृहात एकच हश्शा पिकली.

'या सरकारमध्ये कुठे उगाच अडेलतटूपणा नाही, सर्वांची मानमर्यादा धरून काम पाहिले जात आहे. विषय उगाच लावून धरले जात नाही. 3 चाकी सरकार म्हणतात. पण चौथ चाकं म्हणजे लोकांचा विश्वास आहे, आमचे पाय जमिनीवर घट्ट आहे', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी  फडणवीस यांना टोला लगावला.

Published by: sachin Salve
First published: December 3, 2020, 6:30 PM IST

ताज्या बातम्या