Home /News /mumbai /

शिवसेनेनेही फुंकलं मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगूल, शिवसैनिकांना सज्ज राहण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश

शिवसेनेनेही फुंकलं मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगूल, शिवसैनिकांना सज्ज राहण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश

'विरोधक काय बोलत आहेत त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही तयारीला लागा. त्यांचा समाचार घेण्यास आम्ही सक्षम आहोत.'

मुंबई 20 नोव्हेंबर: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही मुंबई महापालिका निवडणुकीचं (BMC Election) बिगूल फुंकलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील लोकसभा मतदार संघनिहाय, स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेतली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडली. ठाकरे यांनी कोरोना काळात शिवसेनेने (Shivsena)केलेल्या कामांचा आढवा घेतला. मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे असे आदेशही त्यांनी दिलेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिकेवर भाजपचा भगवा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला होता. शिवसेनेचा जीव हा मुंबई महापालिकेत असून ही पालिका शिवसेनेकडून हिसकावून घेणार असल्यांच त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेनेची ही बैठक होत आहे. कोरोना काळात शिवसाईनेकांनी केलेल्या कामच मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केलं. त्यामुळे सगळ्या नेत्यांचं मनोधैर्य वाढल्याचं शिवसेनेचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी सांगितलं. या वर्षात जनतेची फारशी कामं कोरोनामुळे करत आला नाहीत. पण, आता कोणतंही संकट येवो कामं करायची. तुमची स्वतःची काळजी घेत जनतेची काम करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगतल्याचंही ते म्हणाले. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, आता पासून कामाला लागा. आपण कुठे कमी पडलो हे पहा आणि अधिक जोमाने कामाला लागा, विरोधक काय बोलत आहेत त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही तयारीला लागा. त्यांचा समाचार घेण्यास आम्ही सक्षम आहोत असंही त्यांनी सांगितलं
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या