राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, भाजपच्या दिग्गज नेत्याचं भाकित

राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, भाजपच्या दिग्गज नेत्याचं भाकित

'आम्ही सरकार पडावं म्हणून काही वाट पाहात बसलेलो नाही. हे सरकार आपसातल्या वादामुळेच कोसळणार आहे.'

  • Share this:

पुणे, 5 फेब्रुवारी : राज्यातल्या महाआघाडीत तीन पक्ष सहभागी असल्याने कुरबुरी सुरूच असतात. कधी, आवडतं खातं, कधी बंगले तर कधी मुद्यांवरून कुरघोडी सुरू असते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावरून उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, आम्ही सरकार पडावं म्हणून काही वाट पाहात बसलेलो नाही. हे सरकार आपसातल्या वादामुळेच कोसळणार आहे. त्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सावध राहिलं पाहिजे. असं झालच तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं भाकितही त्यांनी व्यक्त केलं. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चाला तोंड फुटलंय.

पाटील पुढे म्हणाले, नागरिकत्व कायद्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भूमिका समंजस असेल तर त्यांनी हा कायदा राज्यात लागू करावा. सीएएविरोधी आंदोलनं सरकारने थांबवावीत. उगीच साप समजून भुई बडवू नका. काँग्रेस सेनेला हिंदुत्वापासून दूर नेतंय, हे दूर्दैवी आहे.

सेनेची जागा मनसे घेऊ पाहणारच. सेनेचा चाहता म्हणून सल्ला की त्यांनी काँग्रेसचा डाव समजून घ्यावा. मराठा आरक्षणात राजकारण नको, सरकारने सुप्रीम कोर्टात ताकदिने लढावं, विरोधकांनाही सोबत घ्यावं असंही ते म्हणाले.

पीडितेच्या उपचारासाठी डॉक्टरांची शर्थ, हिंगणघाट मध्ये मुलींच्या डोळ्यात अश्रू

राज ठाकरेंनी केलं मोदींचं स्वागत

मनसेच्या बदलत्या भूमिकेनंतर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत आहे. अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली. अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार एका ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट असं त्या ट्रस्टचं नाव असून सर्व 67 एकर जमीन या ट्रस्टला दिली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचं राज ठाकरे यांनी तत्काळ स्वागत केलंय. यामुळे राज्यात बदलत्या राजकीय समिकरणाची नांदी झाली असल्याचं बोललं जातंय.

CAAवरून काँग्रेसच्या या दिग्गज मंत्र्याचं CM ठाकरेंनाच आव्हान

काय म्हणाले राज ठाकरे?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली. ह्या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा. ह्या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन. असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

First published: February 5, 2020, 3:50 PM IST

ताज्या बातम्या