CM उद्धव ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी, मातोश्रीवर आला दाऊदच्या नावाने दुबईतून फोन

CM उद्धव ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी, मातोश्रीवर आला दाऊदच्या नावाने दुबईतून फोन

दुबईहून आलेल्या धमकीच्या फोन कॉल नंतर ठाकरे कुटुंबाची सुरक्षा पुन्हा वाढवण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई 6 सप्टेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवास्थानावर दुबई वरून अज्ञान व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारणार आणि मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची फोन करणाऱ्याने धमकी दिली. दुबईहून अज्ञात व्यक्तीने 3 ते 4 फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर केल्याही माहिती पुढे आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारी व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास आता सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ४ फोन काॉल दुबईच्या नंबरवरून आले. फोन कॉल मातोश्री बंगल्यावरील पोलिस आॉपरेटरने घेतले होते.

कोरोना संसर्गामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलिस सुरक्षा कमी केली होती. मात्र आता दुबईहून आलेल्या धमकीच्या फोन कॉल नंतर ठाकरे कुटुंबाची  सुरक्षा पुन्हा वाढवण्यात आली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 6, 2020, 4:24 PM IST

ताज्या बातम्या