मुंबई, 05 ऑगस्ट: मुंबई लोकल (Mumbai Local Train) कधी सुरू होणार? हा प्रश्न सगळेच जण विचारत आहेत. या प्रश्नावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray ) यांनीच मोठं विधान केलं आहे. लोकल वर विचार सुरू असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. लोकलबाबत जबाबदारीचं भान ठेवूनच हा निर्णय घेतला जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
लोकल कधी सुरू करणार ? असा प्रश्न विचारला जातोय. प्रत्येक ठिकाणी रुग्णसंख्या वेगवेगळ्या पद्धतीने आहे. लोकल वर विचार सुरू आहे. राज्यातल्या इतर शहरात शिथिलता देणार आहोत. पण जबाबदारी बाळगून देणार आहोत. संयम सोडू नका , कोणी दुष्मन वा कोणी जवळचा नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे येथील एच/पश्चिम वॉर्ड कार्यालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. CM Uddhav Balasaheb Thackeray inaugurated the new building of the @mybmc H/West Ward office this afternoon. pic.twitter.com/IdWphm7c1a
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 5, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खार एच पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
कृपया संयम सोडू नका. कोणी दुष्मन आहे आणि कोणी लाडके आहेत असं काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा- पुणे मेट्रो उद्घाटनावरुन अमृता फडणवीसांचा अजित पवारांवर हल्लाबोल
काही गोष्टींना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दुकानांच्या वेळांनाही शिथिलता दिली असून इतर गोष्टींमध्येही शिथिलता मिळेल. मात्र जबाबदारी घेऊन आणि जबाबदारीचं भान ठेवूनच निर्बंध उठवले जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai local, Uddhav thackeray