Home /News /mumbai /

मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदींमध्ये फोनवर चर्चा, राज्यासाठी केली महत्त्वाची मागणी

मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदींमध्ये फोनवर चर्चा, राज्यासाठी केली महत्त्वाची मागणी


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची बैठक घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची बैठक घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. राज्यातील कोविड 19 संसर्ग संदर्भातील उपाययोजनांची माहिती दिली आहे

  मुंबई, 08 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित (Maharashtra corona case) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यातील परिस्थितीबद्दल आढावा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra modi) यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. यावेळी लशीचा आणि ऑक्सिजनचा साठा अधिकधिक पुरवावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.  राज्यातील कोविड 19 संसर्ग संदर्भातील उपाययोजनांची माहिती दिली आहे. तसंच राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी तात्काळ लसींचा पुरवठा करण्याचीही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

  पुण्यात हत्येचं सत्र सुरूच, पोलीस निरीक्षकाच्या आईची हत्या

  राज्यातील अनेक जिल्ह्यांत ऑक्सिजनची कमतरता आजही जाणवत आहे. त्यासाठी इतर राज्यांतून ऑक्सिजनचा पुरवठा तात्काळ राज्याला मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर राज्याला विदेशातून लस आयात करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

  बालपणीच्या आठवणी होणार ताज्या; अमेय वाघ पुन्हा होतोय फास्टर फेणे

  राज्यात मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक केंद्रावर लसीकरण बंद करण्यात आले आहे. लशीचा साठा नसल्यामुळे राज्य सरकारला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कोरोना लशीची मागणी केंद्राकडे केली आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या