दोन दिवसांनी उद्धव ठाकरेंची दुसरी अग्निपरिक्षा!

दोन दिवसांनी उद्धव ठाकरेंची दुसरी अग्निपरिक्षा!

नागपूर अधिवेशन हे राजकारणातल्या स्फोटक घटनांसाठी ओळखलं जातं. राजकारणात खळबळ उडविणाऱ्या अनेक घटना नागपूर अधिवेशनाच्या काळात घडलेल्या आहेत.

  • Share this:

मुंबई 14 डिसेंबर : विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली पहिला अग्निपरिक्षा पास करत एक पाऊल पुढे टाकले. तीन पक्षांचं सरकार असल्याने सरकारच्या अनेक निर्णयांना उशीर होतोय. खाते वाटपं तात्पुरतं करण्यात आलंय. त्यावरूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातंय. अजुन मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तार केलेला नाही. धोका टाळण्यासाठी काही पदं रिकामी ठेवून विस्तार करण्यात येणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. सोमवार पासून नागपुरमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत असून त्यात सरकारची दुसरी अग्निपरिक्षा होणार आहे. नागपूर अधिवेशन हे राजकारणातल्या स्फोटक घटनांसाठी ओळखलं जातं. राजकारणात खळबळ उडविणाऱ्या अनेक घटना नागपूर अधिवेशनाच्या काळात घडलेल्या आहेत. त्यामुळे हे अधिवेशन निर्विघ्न पार पडावं यासाठी शिवसेनेचे शिलेदार कामाला लागले आहेत. सरकारला प्रतिमा निर्मितीसाठी हे अधिवेशन महत्त्वाचं आहे. तर सरकार लोकांसाठी निर्णय घेत नाही अशी प्रतिमा तयार करण्याचा विरोधी पक्ष असलेल्या भाजपचा प्रयत्न आहे. त्यावेळे नागपूर अधिवेशन सरकारसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

'राधाकृष्ण विखे-पाटलांच्या जिथं जातील तिथं खोड्या, भाजपमध्ये घेऊन तोटाच झाला'

महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. या नव्या प्रयोगाने भाजपला हादरा बसला आणि देशभर या प्रयोगाची दखल घेतली गेली. सुरुवातीला शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राजी नसलेल्या काँग्रेसने शिवसेनेला अखेर पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रात नवा इतिहास घडला. उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्या घटनेला आता 17 दिवस होताहेत. हे होत असतानाच स्वातंत्रवीर सावरकरांवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडलीय. हा वाद चिघळला तर त्याचा महाराष्ट्र सरकारच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारचा गाडा धावण्याआधीच विघ्न निर्माण होतं की काय अशी शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे ठाकरे सरकारची पुढची वाटचाल ही काटेरी असणार आहे.

राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यावर काय म्हणाले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू

दिल्लीत झालेल्या रॅलीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असतानाच शिवसेनेचे खासदार आणि महाराष्ट्रातल्या सत्ता प्रयोगाचे शिल्पकार संजय राऊत यांनी ट्विटरवरून राहुल गांधी यांना चांगलच सुनावलं. आम्ही नेहरू आणि गांधींचा आदर करतो. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. सुज्ञास सांगणे न लगे असे त्यांनी राहुल गांधी यांना त्यांनी सुनावले.

शिवसेनेचं सावरकरांबद्दलचं प्रेम जगजाहीर आहे. तर काँग्रेसचे दिल्लीतले नेते सावरकरांबद्दल कायम संतप्त भावना व्यक्त करत असतात. त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अनेक विषयांवर टोकाचे मतभेद आहेत. त्यामळेच काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार नव्हती. मात्र शरद पवारांनी सोनिया गांधींचं मन वळवलं आणि अखेर पाठिंबा मिळाला.

राहुल गांधींच्या सावरकर विधानावरून शिवसेना भडकली, राऊत म्हणाले...

किमान समान कार्यक्रम तयार करून महाराष्ट्रात सरकारने पुढे जायचं ठरवलं आहे. मात्र आपल्या भूमिका आणि मतदार सांभाळताना संघर्ष होण्याची शक्यता आहे. अल्पसंख्यकांची घसरत चाललेली मतपेढी सावरण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करतेय. तर कट्टर हिंदुत्ववादी विचारामुळे शिवसेनेकडे मोठा तरूण वर्ग आकृष्ट झालाय. त्यामुळे आपली मतपेढी सावरत पुढे जाताना शिवसेना आणि काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागणार असून महाराष्ट्रा सरकारला सुरूंग लागण्याची शक्यता व्यक्त केलीय जातेय.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 14, 2019, 10:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading