Home /News /mumbai /

'वाटणी'वरून रखडलं ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप

'वाटणी'वरून रखडलं ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप

Mumbai: Senior Congress leader Mallikarjun Kharge, NCP chief Sharad Pawar and Shiv Sena President Uddhav Thackeray along with NCP, Congress and Shiv Sena MLAs during a gathering to display their strength of 162, at Grand Hyatt Hotel in Mumbai, Monday, Nov. 25, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad) (PTI11_25_2019_000248B)

Mumbai: Senior Congress leader Mallikarjun Kharge, NCP chief Sharad Pawar and Shiv Sena President Uddhav Thackeray along with NCP, Congress and Shiv Sena MLAs during a gathering to display their strength of 162, at Grand Hyatt Hotel in Mumbai, Monday, Nov. 25, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad) (PTI11_25_2019_000248B)

महत्त्वाची खाती, पालकमंत्रीपदं, बंगले, दालनांचं वाटप या सगळ्याच गोष्टींवर तीनही पक्षांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे प्रत्येक निर्णयासाठी तीनही पक्षांची मतं विचारात घेऊन पुढे जाण्याचं शिवधनुष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यापुढच्या काळात पेलावं लागणार आहे.

पुढे वाचा ...
    सागर कुलकरर्णी, मुंबई 01 जानेवारी : महाविकास आघाडीचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार झाला. आणि आता बहुचर्चित खातेवापाची प्रतिक्षा आहे. मात्र पदांची आणि खात्यांची वाटणी करण्यात स्पर्धा असल्याने मंत्रिमंडळाचं खातेवाटप रखडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सगळ्याच पक्षांना महत्त्वाची खाती हवी आहेत. ही मलाईदार खाती मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. बुधवारी यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास चर्चा झाली मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. महत्त्वाची खाती, पालकमंत्रीपदं, बंगले, दालनांचं वाटप या सगळ्याच गोष्टींवर तीनही पक्षांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे प्रत्येक निर्णयासाठी तीनही पक्षांची मतं विचारात घेऊन पुढे जाण्याचं शिवधनुष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यापुढच्या काळात पेलावं लागणार आहे. आज महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची  खातेवाटपाबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकासआघाडी सरकार हे तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून स्थापन केले आहे. त्यामुळे खातेवाटपाबाबत पक्षानुसार सविस्तर चर्चा झाली. खातेवाटपाबाबत जवळपास निर्णय झाला आहे. याची घोषणा उद्यापर्यंत होईल असं मला वाटतंय. शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतील, असं अजित पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खाटेवाटपाची यादी ही शरद पवार यांच्याकडे देण्यात आली आहे, याबद्दल ते अंतिम निर्णय घेतील, असंही अजितदादांनी सांगितलं. तसंच या बैठकीमध्ये पालकमंत्री वाटपाबद्दलही चर्चा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

    काँग्रेसला धक्का, मंत्रिपद नाकारल्याने दिग्गज आमदार सोडणार पक्ष

    दरम्यान, आज दिवसभर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेत्यामध्ये खातेवाटप बाबत खलबतं सुरूच होती. पण अजूनही अधिकृतरित्या खातेवाटप जाहीर नाही. सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात नवनियुक्त मंत्री अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांची पहिल्यांदा सकाळी दहा वाजता स्वतंत्र बैठक झाली. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली.

    आश्चर्य...कोकणातल्या जंगलात दुर्मिळ 'वनमानव', वाचून थक्क व्हाल थक्क

    या बैठकीला काँग्रेसचे बहुतेक सर्व नेते तसंच आदित्य ठाकरे उपस्थित होते. या बैठकीनंतर न उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे सर्वजण पोहोचले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत खातेवाटप चर्चा केली. या बैठकीत कालांतराने उपमुख्यमंत्री अजित पवार देखील सहभागी झाले.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Uddhav thackeray

    पुढील बातम्या