Home /News /mumbai /

CM उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत नेमकं काय झालं? वाचा INSIDE STORY  

CM उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत नेमकं काय झालं? वाचा INSIDE STORY  

कोरोनाचं संकट आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची प्रत्यक्ष भेट झाली.

मुंबई 27 एप्रिल: राज्यावर असलेलं कोरोनाचं संकट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार म्हणून नियुक्त होण्याचा प्रश्न या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज महत्त्वाची बैठक झाली. मुंबईत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकातील जुन्या महापौर बंगल्यात ही बैठक झाली. त्याला उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या बैठकीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील माहीती उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य प्रस्तावावर चर्चा झाली तसेच राज्यातील COVIDE 19 संदर्भात सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढाव्याची  ताजी माहीतीही मुख्यमंत्र्यांनी पवारांना दिली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्य संदर्भातील प्रस्तावाचं स्मरण राज्यपालांना सरकार करून देणार आहे. या संदर्भात आता राज्यपाल काय निर्णय घेतील. राज्यपालांच्या निर्णया नंतर जी काही राजकीय परिस्थिती उद्धभवेल त्याचा सामना करण्यासंदर्भात महत्वाची चर्चा झाल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत घटना तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन जो तांत्रिक पेच निर्माण झाली आहे. त्याच संदर्भात महत्वाची चर्चा झाली. हे वाचा-   पुण्या-मुंबईबाहेर राज्यातही वाढला कोरोनाचा धोका; दिवसभरात 27 बळी बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या अनुभवावरून निर्माण झालेला राजकीय पेच कायदेशीर कसा सोडवू शकतो यावर उपस्थित नेत्यांना मार्गदर्शन केलं असल्याची माहीतीही सूत्रांनी दिलीय. अशा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी काम करण्याचा मोठा अनुभव शरद पवारांच्या पाठिशी आहे. हे वाचा-  फक्त सर्दी, ताप खोकलाच नाही तर शास्त्रज्ञांना कोरोनाची सापडली आणखी 6 लक्षणं त्यासंदर्भातही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काही सूचना दिल्या आणि सल्लेही दिलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांचा उल्लेख कायम मार्गदर्शक म्हणून करतात. त्यामुळे त्यांनीही पवारांचं अनेक विषयांवरचं मत जाणून घेतलं. कोरोनाचं संकट आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची प्रत्यक्ष भेट झाली.
Published by:Priyanka Gawde
First published:

पुढील बातम्या