#BREAKING: रेड झोनमध्ये निर्बंध सैल करणं अशक्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

#BREAKING: रेड झोनमध्ये निर्बंध सैल करणं अशक्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढते आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद इथे जास्त रुग्ण आहेत.

  • Share this:

मुंबई, 18 मे :  मुंबई, 18 मे : लॉकडाऊन का वाढवला हे सांगत असतानाच नवा लॉकडाऊन कसा असेल याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आणखी काही निर्बंध शिथिल होणार, असं मुख्यमंत्री म्हणाले. पण महापालिका क्षेत्रातल्या रेड झोन क्षेत्रांमध्ये निर्बंधांमध्ये फारशी शिथिलता आणता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. टप्प्याटप्प्याने एकेक गोष्ट सुरू होईल. गावी जायची घाई करू नका, असं ते म्हणाले.

31 मे पर्यंत महाराष्ट्रासह देश लॉकडाऊनमध्ये आहे. पण यामागे कुणाला डांबून ठेवायचा उद्देश नाही, असं ठाकरे म्हणाले. "कुणालाही घरात डांबून ठेवणं यासारखी शिक्षा नाही. लॉकडाऊनचं चक्रव्यूह भेदणार आहोत की नाही, याचं उत्तर जगात कुणाकडे नाही. आपल्याकडेही नाही", असं त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊन का वाढवला?

महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढते आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद इथे जास्त रुग्ण आहेत. जर लॉकडाऊन, संचारबंदी केली नसली तर रुग्णसंख्या किती झाली असती, किती लोक गमावले असते याची आकडेवारी ऐकून थरकाप उडतो. कोरोना संपलेला नसला, तरी त्याचा संसर्ग कमी झाला आहे. गतिरोधक म्हणून लॉकडाऊनचा उपयोग झाला आहे.

उद्योग सुरू झाले

आजपर्यंत 50 हजार उद्योग सुरू झाले आहेत. 5 लाख मजूर आणि कामगार काम करू लागले आहेत. 70 हजार उद्योगांना परवानगी दिली आहे. पण महापालिका क्षेत्रात निर्बंध अजूनही कडक आहेत. महापालिकांच्या व्यतिरिक्त भागात उद्योग सुरू झाले आहेत.

भूमिपूत्रांना आवाहन

कोरोनाचं संकट आल्याने अनेक स्थलांतरित मजूर आपापल्या गावी परत गेले आहेत. अजूनही परत चालले आहेत. पण आता राज्यातल्या उद्योगांचं काय करायचं? मी भूमिपुत्रांना आवाहन करतो, की हे उद्योग सुरू व्हायला तुम्ही पुढे या. तुम्ही सरकारचं आतापर्यंत ऐकलं आहे. आताही ऐका. आपण मोदींच्या शब्दांत आत्मनिर्भर महाराष्ट्र उभा करू या

परप्रांतीयांना आवाहन

ट्रेनची सुविधा सुरू झाली आहे. हळूहळू आणखी ट्रेन वाढतील. तुम्ही उतावीळ होऊ नका. तुम्हाला सुरक्षितपणे तुमच्या राज्यात पाठवू. कृपया रस्त्यावरून चालत जाऊ नका. स्वतःचा जीव धोक्यात टाकू नका. सरकार तुमची काळजी घेईल. तुमच्या घरी सोडायची जबाबदारी आमची आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

Coronavirus चा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्यामुळे आजपासून देशभरात चौथ्यांदा टाळेबंदी कायम ठेवली आहे. या Lockdown 4.0 ला सुरुवात झाली असली तरी या लॉकडाऊनमध्ये आधीपेक्षा अनेक निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.

First published: May 18, 2020, 8:47 PM IST

ताज्या बातम्या