मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता

दिवाळीनंतर शाळाही सुरू करण्यात येणार आहे. परंतु, अद्याप मंदिर उघडण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही

  • Share this:

मुंबई,  08 नोव्हेंबर : राज्यात कोरोनाची (corona) लाट आता ओसरत चालली आहे. मुंबईसह (Mumbai) अनेक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackery) आज दुपारी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे काय घोषणा करता हे पाहण्याचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुपारी 1.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. फेसबुक आणि युट्यूबवर व्हिडीओ लाईव्ह करून मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहे. अनलॉकमध्ये राज्यातील अनेक उद्योग-धंद्यांना अटी शर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. दिवाळीनंतर शाळाही सुरू करण्यात येणार आहे. परंतु, अद्याप मंदिर उघडण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.  त्यामुळे उद्धव ठाकरे आज मंदिर उघडण्याची घोषणा करता का हे पाहण्याचे ठरणार आहे.

मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश

दरम्यान, मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असं आवाहन करताना मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिले आहे. मुंबईत कोरोना उपचारासाठीच्या ज्या जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांची देखभाल दुरूस्ती करावी. जेणेकरून आगामी काळात गरज भासल्यास त्यांचा वापर करता येईल. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून राबविण्याचे विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी

कोरोनामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी आढावा बैठक घेतली होती. यावेळी मुंबई महानगरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वीपणे राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

'जनतेला दिवाळी सुखाची जावी यासाठी आपण सर्वांनी सतर्कता बाळगत जनजागृतीच्या माध्यमातून कोरोनाचा धोका संपला नसल्याची जाणीव करून द्यावी. प्रदूषण कमी झाले नाही तर कोरोनाचे संकट कायम राहील ही बाब नागरिकांना पटवून द्यावी, असे आवाहन त्यांनी  महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केले.

भरधाव मारुती स्विफ्ट कारला पाठीमागून जोरात धडक, 3 जण जागीच ठार

'रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांमध्ये मास्क न वापरण्याबाबत बेफिकीरी दाखविली जात आहे. तसे न करता मास्क वापरण्याबाबत मोहीम अधिक तीव्र करावी. कायद्याचा धाक दाखवितानाच जनजागृतीवर अधिक भर देऊन मास्क वापरण्याचे आवाहन करावे, असे निर्देशनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Published by: sachin Salve
First published: November 8, 2020, 11:16 AM IST
Tags:

ताज्या बातम्या