मुंबई, 24 नोव्हेंबर : देशभरात कोरोनाची दुसरी लाट येणार अशी भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहे. यावेळी 'महाराष्ट्रात कोरोना लसीकरण (corona vaccine)कशा रितीने करावे, लसीचे वितरण कसे करता येईल या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे' अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी कोरोनामुळे त्रस्त असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती आढावा सादर केला.
...तर ती कोणती मर्दानगी होती? BJP नेत्यानं कंगनावरून संजय राऊतांना पुन्हा डिवचलं
तसंच, 'कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशा रितीने करावे, लसीचे वितरण कशा प्रकारे करता येईल, या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी
दरम्यान, राज्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या आठवड्याभरात पहिल्यांदाच कमी आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपेक्षा दैनंदिन नव्या रुग्णांची (Covid-19) संख्या थोडी कमी नोंदली गेली. सोमवारी राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 4153 कोविड रुग्णांचं निदान झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 30 कोरोना रुग्णांचा मृत्यू नोंदला गेला. त्यामुळे राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.61 टक्के एवढा झाला आहे.
प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाईवर देवेंद्र फडणवीस म्हणाले...
राज्यात आजपर्यंत एकूण 16,54,793 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.74 % एवढं झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.