देवेंद्र फडणवीसांना दणका, निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयांना स्थगिती

देवेंद्र फडणवीसांना दणका, निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयांना स्थगिती

मुख्यमंत्रिपदावर येताच उद्धव ठाकरे यांनी आधीच्या सरकारचे अनेक निर्णय फिरवले आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात भाजप आणि शिवसेनेत मोठी राजकीय लढाई होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

प्रफुल साळुंखे, मुंबई 05 डिसेंबर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्या काळात मंत्रिमंडळाच्या अनेक बैठका घेऊन निर्णयांचा सपाटा लावला होता. त्यातल्या नगरविकास विभागाने घेतलेल्या निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिलीय. त्याबाबतचे आदेश आज काढण्यात आलेत. स्थगित केलेले सर्व निर्णय हे नगरविकास विभागाचे असून ते खातं हे देवेंद्र फडणवीसांकडेच होतं. त्यामुळे हा त्यांना दणका असल्याचं मानलं जातंय. ज्या कामांचे आदेश निघाले आणि निधी मंजूर झाला त्याची यादी तातडीने पाठवावी आणि ज्याचे आदेशच निघाले नाहीत त्यावर पुढील आदेशापर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नये असे निर्देशही नव्या आदेशत देण्यात आले आहेत. मुख्यमंत्रिपदावर येताच उद्धव ठाकरे यांनी आधीच्या सरकारचे अनेक निर्णय फिरवले आहेत.

फडणवीसांचे 'संकटमोचक' अडचणीत, चार सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शक्यता!

आरेतल्या मेट्रोच्या कार शेडला स्थगिती, आंदोलकांवरचे गुन्हे मागे, नाणार प्रकल्पातल्या आणि इतर काही समाजिक आंदोलनातल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचंही सरकारने म्हटलं आहे. तर फडणवीस यांच्या जवळच्या नेत्यांच्या साखर कारखाण्यांना राज्या सरकारकडून देण्यात आलेली बँक हमीचा निर्णयही मागे घेण्यात आलाय. त्यामुळे यापुढच्या काळात भाजप आणि शिवसेनेत मोठी लढाई होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना भेटणार

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एका महत्त्वाच्या बैठकीसाठी पुण्यात येत आहेत. हे दोनही दिग्गज नेते पोलिस महासंचालकांच्या एका परिषदेसाठी पुण्यात येत असून त्यांचा दोन दिवस शहरात मुक्काम असणार आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असून मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आणि पंतप्रधान मोदी आणि अमित शहा पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत.

फडणवीसांचे 'संकटमोचक' अडचणीत, चार सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शक्यता!

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर टीका केली होती. मात्र नरेंद्र मोदी यांच्याबद्दल त्यांनी सौम्य भूमिका घेतली होती. मोदींवर ठाकरेंनी टीका टाळल्याने या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे.

देशातल्या सर्व राज्यांचे पोलीस प्रमुख आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारी यांची परिषद दरवर्षी होत असते. त्या बैठकीला पंतप्रधान आणि गृहमंत्री उपस्थित राहतात. 2014 पर्यंत ही बैठक दिल्लीत होत असे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विविध राज्यांमध्ये दरवर्षी दिल्ली बाहेर ही परिषद घेण्याचा पायंडा मोदींना पाडला. त्यानुसारच ही परिषद यावर्षी पुण्यात होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2019 06:49 PM IST

ताज्या बातम्या