मुंबई, 15 डिसेंबर : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर होत असलेल्या टीकेला अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. 'मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. गेल्या वेळी आपण सगळे एकत्र होतो. आपण वकिलांची फौज जशीच्या तशी ठेवली आहे. संघटनांशी चर्चा सुरू असते. अशोक चव्हाण हे वकिलांशी कायम बोलत असतात. इतर समाजाचे आरक्षण कमी करणार का अशी चर्चा काही सडक्या डोक्यातून आली आहे. मी जबाबदारीने सांगत आहे की कोणाचंही आरक्षण कमी करणार नाही,' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आरक्षणप्रश्नी होत असेलल्या आरोपांवर पलटवार केला.
भाजपमध्ये राज्यातील नेतृत्वावरून होत असलेल्या कथित संघर्षावरूनही उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे. 'देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जावेत, अशी सर्वांची इच्छा आहे. सुधीर मुनगंटीवार यांची तर अशी इच्छा आहेच आहे,' असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची चौफेर फटकेबाजी, नक्की काय म्हणाले?
- हे अधिवेशन आपण दोन दिवस घेतलं, दिल्लीचे तर घेता पण आलं नाही
- कोरोनाबद्दलचं श्रेय घ्यायची वेळ नाही, पण WHO, Washington post ला जे दिसलं ते तुम्हाला दिसलं नाही
- पाश्चिमात्य देशांमध्ये पुन्हा कोव्हिडचा प्रकोप वाढलाय
- माझं कुटुंब माझी जबाबदारी देशातील एकमेव योजना असेल
- महाराष्ट्राचा आरोग्याचा नकाशा तयार आहे
- मृत्यूंची संख्या आपण लपविलेली नाही
- आपण जगासमोर सत्य ठेवलं आहे
- आपल्या मुंबईत 17 दिवसात रुग्णालय उभे केलं त्याचं कौतुक करणार की नाही ?
- आपल्या राज्याने तज्ज्ञ डॉक्टरांचं टास्क फोर्स तयार केलं होतं
- मी शासकीय यंत्रणा, पोलीस, लोक प्रतिनिधी, स्वसंयेवी संस्था यांना धन्यवाद देतो
- मी कारशेडच्या मुद्यावर काही बोलणार नाही कारण विषय कोर्टात आहे
- कोणाच्या फायद्यासाठी आहे बुलेट ट्रेन ?
- मुंबईतून किती लोकं बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार ?
- मिठागराचा खडा टाकू नका
- राज्याच्या हिताच्या आड येणारे राजकारण आपण करू नये
- कारशेड कांजुरला नेण्याने अनेक फायदे भविष्यात होणार आहेत
- राज्याला मातीत घालणारे राजकारण नको
- शेतकऱ्यांना चीनी, पाकिस्तानी, देशद्रोही ठरवणार आहेत का ?