मुंबई, 26 जून : एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट (corona) आणि दुसरीकडे ईडी (ed)-सीबीआय (cbi) तपास यंत्रणेचा महाविकास आघाडीच्या (mva goverment) मंत्र्याच्या मागे ससेमिरा कायम आहे. हे सगळं सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी स्वबळाचा नारा देऊन महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ उडवून दिली. त्यामुळे नाराज झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांना फोन करून नाराजी व्यक्त केली.
स्वबळाची नारेबाजी करणारे नाना पटोले यांची गाडी अखेर दिल्लीत रुळावर आली आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाना पटोलेंची चांगलीच समजूत काढली. त्यामुळे नाना पटोलेंना आता नरमाईची भूमिका घ्यावी लागली. पण, त्याआधी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच याबद्दल काँग्रेस नेत्यांकडे तक्रार केली होती. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
टीम इंडियाच्या 20 दिवसांच्या सुट्टीवर माजी कॅप्टन नाराज, विराटवरही केली टीका
या दोन्ही नेत्यांची याबद्दल दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना याची माहिती दिली. पण, तरीही नाना पटोले यांच्याकडून स्वबळाची नारेबाजी सुरूच होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोन करून आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. 'राज्यात एकीकडे ईडी आणि सीबीआय या राष्ट्रीय तपास यंत्रणांनी आमदार आणि मंत्र्यांना टार्गेट केले आहे. अशा परिस्थितीत आम्हीही त्यांच्याशी लढा देत असताना काँग्रेसकडून स्वबळाची भाषा कशाला? राज्य कसे चालवायचे? लोकांमध्ये आपण एकत्र आहोत, याचा संदेश कसा जाणार? अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली होती. सोनिया गांधी यांच्याशी बोलणं झाल्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला.
‘पायल रोहतगीला अटक करण्यासाठी पोलिसांनी घेतले पैसे’; संग्राम सिंगचा मोठा आरोप
नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले. त्यामुळे गुरुवारी धुळे जिल्ह्याचा दौरा अर्धवट सोडून नाना दिल्लीत दाखल झाले. पटोले दिल्लीला पोहोचल्यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रभारी आणि सरचिटणीस एच. के. पाटील व के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत बैठक पार पडली.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाना पटोले यांना दिल्लीत बोलावून चांगलाच समज दिला. ही बैठक जवळपास पावणे दोन तास सुरू होती. बैठकीनंतर एच के पाटील यांनी म्हटलं, स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा प्री मॅच्युअर आहे. आत्ता तो विषय नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रात स्वबळाचा नारा देणारे नाना पटोले हे दिल्लीत गारद पडले आणि त्यांचा स्वबळाचा नारा हा फुसका बार ठरला असल्याचं बोललं जात आहे.
बैठकीनंतर नाना पटोले काय म्हणाले?
नाना पटोले यांनी म्हटलं, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका बाबत चर्चा झाली. पक्षाची संघटना मजबूत करण्यावर चर्चा झाली. प्रदेश संघटनेत किती उपाध्यक्षपद असावीत, सरचिटणीस किती असावेत यावर सुद्धा चर्चा झाली. राहुल गांधींना मला भेटायचे आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली. विधानसभा अध्यक्षाची निवड याच अधिवेशनात झाली पाहिजे. ईडीचा दूरुपयोग मोदी सरकार करत असल्याचं अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईतून दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.