मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन!

मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मुंबई, 29 मार्च : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यानंतर आज सकाळी पोटात दुखू लागल्यामुळे शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ((Breach Candy Hospital, Mumbai) दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी शरद पवारांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली.

शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत असल्यामुळे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर राज्यभरातील मान्यवरांनी शरद पवार यांच्याशी फोनवर संवाद साधून प्रकृतीची विचारपूस केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शरद पवार यांना फोन केला होता. त्यांच्या प्रकृतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी विचारपूस केली.

'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत'' असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. शरद पवार यांना पोटात दुखू लागल्यामुळे रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आले होते. पण, पित्ताशयाचा त्रास अधिक जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 31 मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर पुढील 2 आठवडे ते घरीच विश्रांती करणार आहे, या काळात त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

तसंच, शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

First published:

Tags: Mumbai, Sharad pawar