महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला गंभीर इशारा?

महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला गंभीर इशारा?

काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 मे : विधान परिषद निवडणुकीवरून राजकीय वातावरण पेटले आहे. काँग्रेसने विधान परिषदेसाठी दुसरा उमेदवार उभा केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. 'जर काँग्रेस आडमुठेपणा सोडणार नसेल तर मी विधान परिषद निवडणुक लढवणार नाही', असा इशाराच उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही आहे. मात्र, तरी देखील काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पहिल्यापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रयत्न आहे. यासाठी काँग्रेसने एका जागेवर उमेदवार द्यावा अशी विनंती करण्यात आली होती. परंतु, काँग्रेसकडून दोन उमेदवार उभे करण्यात आले आहे.

काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी राजेश राठोड यांना  उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर थोरातांनी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचं नाव जाहीर केलं आहे.

हेही वाचा -धक्कादायक! कोरोनाने घेतला आणखी एका पोलिसाचा बळी, मुंबईत अधिकाऱ्याचा मृत्यू

पण, काँग्रेसने दुसरा उमेदार देऊ नये. महाविकास आघडीचे सहा उमेदवार ऐवजी पाच उमेदवार द्यावेत जेणेकरून विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल, अशी भूमिका सेनेनं घेतली होती.

आता काँग्रेसवर महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा दबाव आहे. काँग्रेस आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

'मातोश्री'वरून थोरातांना देण्यात आला होता निरोप

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय  मिलिंद नार्वेकर यांनी  शनिवारी रात्री  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या खास निरोप घेऊन थोरात यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. थोरात यांच्या रॉयल स्टोन या निवासस्थानी  रात्री उशिरा नार्वेकर भेट घेत ठाकरे यांचा निरोप दिला.

हेही वाचा - जितेंद्र आव्हाड जिंकले.. कोरोना हरला! तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असेच राहू द्या

विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांची आग्रही भूमिका आहे. मात्र, काँग्रेस दुसरा उमेदवार लढवण्यावर ठाम आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने दुसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी नार्वेकर यांनी भेट घेतल्याचं समजतं. या भेटी दरम्यान,  उद्धव ठाकरे  आणि बाळासाहेब थोरात यांच्यात दूरध्वनीवरून चर्चाही केली होती.

भाजपकडून कोण आहे मैदानात?

दरम्यान, भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांना डावललं आहे.  भाजपकडून विधानपरिषदेसाठी यावेळी नवीन नेत्यांना संधी दिली आहे. डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 10, 2020, 1:29 PM IST

ताज्या बातम्या