Home /News /mumbai /

...अशाने सरकार तरी कसे चालेल? मुख्यमंत्री ठाकरेंची काँग्रेस हायकमांडकडे नाराजी व्यक्त

...अशाने सरकार तरी कसे चालेल? मुख्यमंत्री ठाकरेंची काँग्रेस हायकमांडकडे नाराजी व्यक्त

मुख्यमंत्री ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्याकडे सुद्धा आपली नाराजी बोलून दाखवली होती.

  मुंबई, 26 जून : स्वबळावर निवडणुकीचा नारा देऊन काँग्रेसने (congress) राज्यात एकच खळबळ उडवून दिली होती. पण, 'मी एकीकडे ईडी (ed) आणि सीबीआय (cbi) या राष्ट्रीय तपास यंत्रणेशी लढा देत असताना माझ्यासोबतच लढण्याची भाषा वापरणे हे कितपत योग्य आहे? अशाने सरकार तरी कसे चालेल' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी काँग्रेस हायकमांडकडे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नाना पटोले (nana patole) यांना दिल्लीला बोलावून चांगलाच समज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर नाना पटोले यांनी जोरदार बॅटिंग करत भाजपला अंगावर घेतले. पण अलीकडे स्वबळाचा नारा देऊन मित्रपक्षांना चांगलाच धक्का दिला. त्यामुळे दिल्ली हायकमांडने नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, पटोले दिल्लीला पोहोचल्यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रभारी आणि सरचिटणीस एच. के. पाटील व के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत बैठक पार पडली. एकच नंबर! भारतीय सैन्याची हटके स्टाईल, स्वतः दहशतवादी झाला सरेंडर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. 'राज्यात एकीकडे ईडी आणि सीबीआय या राष्ट्रीय तपास यंत्रणांनी आमदार आणि मंत्र्यांना टार्गेट केले आहे. अशा परिस्थितीत आम्हीही त्यांच्याशी लढा देत असताना काँग्रेसकडून स्वबळाची भाषा कशाला? राज्य कसे चालवायचे? लोकांमध्ये आपण एकत्र आहोत, याचा संदेश कसा जाणार? अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी  बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्याकडे सुद्धा आपली नाराजी बोलून दाखवली होती. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीच्या वरिष्ठांकडे याबद्दल माहिती दिली होती. पण, पटोले यांच्याकडून राज्यात स्वबळाची नारेबाजी सुरूच होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोन करून याबद्दल माहिती दिली. पैशापुढं मैत्री हरली; मुंबईत युवकांनी लोखंडी रॉडनं वार करत मित्राचं डोकं ठेचलं त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाना पटोले यांना दिल्लीत बोलावून चांगलाच समज दिला. ही बैठक जवळपास पावणे दोन तास सुरू होती. बैठकीनंतर एच के पाटील यांनी म्हटलं, स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा प्री मॅच्युअर आहे. आत्ता तो विषय नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रात स्वबळाचा नारा देणारे नाना पटोले हे दिल्लीत गारद पडले आणि त्यांचा स्वबळाचा नारा हा फुसका बार ठरला असल्याचं बोललं जात आहे. बैठकीनंतर नाना पटोले काय म्हणाले? नाना पटोले यांनी म्हटलं, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका बाबत चर्चा झाली. पक्षाची संघटना मजबूत करण्यावर चर्चा झाली. प्रदेश संघटनेत किती उपाध्यक्षपद असावीत, सरचिटणीस किती असावेत यावर सुद्धा चर्चा झाली. राहुल गांधींना मला भेटायचे आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली. विधानसभा अध्यक्षाची निवड याच अधिवेशनात झाली पाहिजे. ईडीचा दूरुपयोग मोदी सरकार करत असल्याचं अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईतून दिसून येत आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Congress, काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष

  पुढील बातम्या