मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'या' कामासाठी राज्यपालांना केली विनंती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'या' कामासाठी राज्यपालांना केली विनंती

शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी

  • Share this:

सागर कुलकर्णी,(प्रतिनिधी)

मुंबई,7 डिसेंबर: कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे आहे. त्यांचे कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून सर्व भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. म्हणूनच त्यांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सुचविले आहे. यापूर्वी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या नावात देखील छत्रपती शिवाजी महाराज असा संपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.

अशाच रितीने केवळ शिवाजी महाराजच नव्हे तर राज्याच्या सर्व आदरणीय महापुरुष व दैवतांच्या नावाने असणाऱ्या शासकीय योजना, कार्यक्रम व ठिकाणे यांचा नामविस्तार करून त्यांच्या संपूर्ण नावाचा उल्लेख करण्याच्या दृष्टीने बदल करण्याचा मानस देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. उदाहरणादाखल केवळ ज्योतिबा फुले असे न म्हणता महात्मा ज्योतिराव फुले, संभाजी ऐवजी छत्रपती संभाजी महाराज असे नामविस्तार करून या महापुरुषांचा योग्य तो गौरव करावा, या दृष्टीने संबंधित विभागांनी कार्यवाही सुरु करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

शिवरायांचा एकेरी उल्लेख टाळा..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आरे आंदोलन आणि नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले. आता मराठा आंदोलक आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही मुख्यमंत्र्यांकडे याबद्दल मागणी केली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करून दोन नव्या मागण्या केल्या आहे. मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणे आणि कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासहित' महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी महाराज' असे करणे (उदा. 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर) अशी मागणी केली.

मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणे आणि कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासाहित' महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी महाराज' असे करणे (उदा. 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर) बाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे.सार्वजनिक ठिकाणी वास्तूंना नाव देताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केला जातोय. हे थांबवण्यासाठी संभाजीराजे यांनी ही मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता.

शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. " आजकालच्या आचार आणि विचार शून्य राजकरण्यांनी महाराजांचं नाव राजकारणात वापरू नये अशीही सर्व शिवभक्तांची भावना आहे. त्यामुळे रवी शंकर प्रसाद यांनी तात्काळ अन् बिनशर्त माफी मागावी" अशी मागणी त्यांनी केली होती.

Published by: Sandip Parolekar
First published: December 7, 2019, 7:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading