मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा.. कोणाकडे कोणत्या खात्याची जबाबदारी

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा.. कोणाकडे कोणत्या खात्याची जबाबदारी

काही दिवसांपासून रखडलेलं उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप काही क्षणात जाहीर होणार आहे.

  • Share this:

मुंबई 04 जानेवारी:गेल्या काही दिवसांपासून रखडलेले उद्धव ठाकरे सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रविवारी मान्यता दिली आहे. राज्यपाल कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ खातेवाटप फाईल राज्यपाल महोदय यांनी सही करून फाईल पाठवण्यात आली होती.

घोषणेआधीच समोर आली यादी..

खातेवाटपाबाबतची अधिकृत घोषणा होण्याआधीच यादी समोर आली आहे. राष्ट्रवादीने गृह खाते हे अनिल देशमुखांकडे देत सगळ्यांनाच धक्का दिला आहे. तर पर्यावरण खाते हे आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 2019 च्या शेवटी म्हणजे 30 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र खातेवाटपावर एकमत होत नव्हते. शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्याकडे महत्त्वाची खाती ठेवल्याचे मत काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले होते. अखेर या खातेवाटपामध्ये राष्ट्रवादीने गृह खाते हे अनिल देशमुखांकडे देत सगळ्यांनाच धक्का दिला आहे. तर पर्यावरण खाते हे आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

शिवसेनेने आपल्याकडील महत्त्वाच्या नेत्यांना महत्त्वाची खाती दिली आहे.पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेले आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार खाते देण्यात येणार आहे. तर सेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आधी गृह खाते होते, आता त्यांच्याकडे नगरविकास आणि एमएसआरडीसी खाते देण्यात येणार आहे. तर सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग खाते कायम ठेवण्यात आलं आहे. तसंच शंकरराव गडाख यांच्याकडे जलसंधारण आणि संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी, फलोत्पादन खाते सोपवण्यात आले आहे. राजीनाम्याचा इशारा देणारे अब्दुल सत्तार यांच्याकडे महसूल आणि ग्रामविकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या अर्थात अर्थ खाते सोपवण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अनिल देशमुख यांच्याकडे गृह खाते सोपवण्यात आले आहे. अनिल देशमुख यांच्याकडे गृहखाते सोपवून सर्वांना एकच धक्का दिला आहे. तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे  अन्न व नागरी पुरवठा हे खाते सोपवण्यात आले आहे.

तर काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते सोपवण्यात येणार आहे. तर नितीन राऊत यांच्याकडे ऊर्जा खाते सोपवण्यात येईल.  वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण आणि अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक विभाग देण्यात येणार आहे.

कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे..

1. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री- सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती

2.अजित अनंतराव पवार,उपमुख्यमंत्री- वित्त, नियोजन

3.सुभाष राजाराम देसाई-उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

4. अशोक शंकरराव चव्हाण- सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)

5. छगन चंद्रकांत भुजबळ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

6.दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील-कामगार, राज्य उत्पादन शुल्क

7.जयंत राजाराम पाटील-जलसंपदा व लाभक्षेत्र विकास

8.नवाब मोहम्मद इस्लाम मलिक-अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता

9.अनिल वसंतराव देशमुख- गृह

10. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात- महसूल

11. राजेंद्र भास्करराव शिंगणे-अन्न व औषध प्रशासन

12. राजेश अंकुशराव टोपे-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

13.हसन मियालाल मुश्रीफ- ग्रामविकास

14. डॉ.नितीन काशिनाथ राऊत- ऊर्जा

15. वर्षा एकनाथ गायकवाड-शालेय शिक्षण

16. डॉ.जितेंद्र सतिश आव्हाड- गृहनिर्माण

17. एकनाथ संभाजी शिंदे- नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

18. सुनिल छत्रपाल केदार- पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण

19.विजय वडेट्टीवार- इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन

20. अमित विलासराव देशमुख- वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य

21. उदय रविंद्र सामंत- उच्च व तंत्र शिक्षण

22. दादाजी दगडू भुसे- कृषी, माजी सैनिक कल्याण

23. संजय दुलिचंद राठोड- वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

24.गुलाबराव रघुनाथ पाटील- पाणी पुरवठा व स्वच्छता

25. ॲड. के.सी. पाडवी- आदिवासी विकास

26. संदीपानराव आसाराम भुमरे- रोजगार हमी, फलोत्पादन

27. बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील- सहकार, पणन

28. अनिल दत्तात्रय परब- परिवहन, संसदीय कार्य

29. अस्लम रमजान अली शेख- वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास

30. ॲड. यशोमती ठाकूर (सोनवणे)- महिला व बालविकास

31. शंकराराव यशवंतराव गडाख- मृद व जलसंधारण

32. धनंजय पंडितराव मुंडे- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

33. आदित्य उद्धव ठाकरे- पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

राज्यमंत्री

1. अब्दुल नबी सत्तार- महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

2. सतेज उर्फ बंटी डी. पाटील- गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

3. शंभुराज शिवाजीराव देसाई- गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

4. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू- जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

5. दत्तात्रय विठोबा भरणे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

6. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम- सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

7. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

8. संजय बाबुराव बनसोडे- पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

9. प्राजक्त प्रसादराव तनपुरे- नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

10.श्रीमती आदिती सुनिल तटकरे- उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 5, 2020 08:36 AM IST

ताज्या बातम्या