महाविकास आघाडीतल्या वाचाळवीरांनी वाढवली उद्धव ठाकरेंची डोकेदुखी

महाविकास आघाडीतल्या वाचाळवीरांनी वाढवली उद्धव ठाकरेंची डोकेदुखी

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विविध वक्तव्यामुळे सरकारमध्ये बेबनाव निर्माण होत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होतोय.

  • Share this:

मुंबई 28 जानेवारी : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या एका व्यक्तव्यामुळे महाआघाडीत ठिणगी पडलीय. सरकारमध्ये येताना शिवसेनेकडून घटनेप्रमाणे काम करणार असं लिहून घेतलं असं वक्तव्य चव्हाणांनी केलं होतं त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाराज असल्याची माहिती आहे. चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे अकारण गैरसमज पसरले आहेत. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं मत आहे. त्यामुळे अशी वक्तवे टाळावीत अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचं बोललं जातंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अशोक चव्हाणांनी असं वक्तव्य का केलं हे माहिती नाही अशी प्रतिक्रिया काल व्यक्त केली होती.

तीन वेगवेगळ्या देशाची तोंडे असणारी पक्ष राज्यात एकत्रित येत महाविकास आघाडी स्थापन झाली खरी पण शपथविधी होऊन पन्नास दिवस पूर्ण होत नाही तोच महाविकास आघाडीतील वेगवेगळ्या नेत्यांची विधान महाविकास आघाडीचं अंतर्गत कलह वाढवणारी ठरली आहे. शिवसेनेच्या वतीने दररोज बोलणारे संजय राऊत भलेही महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेत सत्तेत महत्त्वाचा वाटा आणण्यासाठी रोल महत्वाचा केला असला तरी वेगवेगळ्या विधानावरून संजय राऊत वादग्रस्त ठरले आहेत.

लग्नाच्या निमंत्रणासाठी या तरुणांनी लढवली अशी भन्नाट आयडिया

संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांची करिमलालाची भेट घेतली असं वक्तव्य केलं होतं. महाविकास आघाडीलाच काँग्रेस नेत्यांवर केलेली टीका हा चर्चेचा विषय ठरला आहे. दुसरीकडे संजय राऊत यांना ट्विटरवरून टीका करणारे  मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेस पक्षात दोन माजी मुख्यमंत्री असलेले चव्हाण यांची विधान गेल्या काही महिन्यात महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरले त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014ला शिवसेनेकडून काँग्रेससोबत आघाडी करण्याचे ऑफर होती असं विधान केल्यानंतर न शिवसेनेत नाराजी व्यक्त झाली होती.

मिलिंद देवरांच्या पत्रामुळे खळबळ, काँग्रेसच्या मंत्र्यांची सोनियांकडे तक्रार

संजय राऊत यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विकास आघाडीतील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलेली विधाने हा विकास आघाडीत चर्चेचा विषय ठरला. चव्हाण यांनी मुसलमानांसाठी शिवसेनेसोबत सत्तेत गेलो हे विधान केल्यानंतर भाजपाकडून चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली त्याचवेळी शिवसेनेवर देखील सोशल मीडियावर विषय टिकेचा ठरला.

NIA ची टीम रिकाम्या हाती माघारी परतली, राज्य सरकार घेणार मोठा निर्णय

आता परत एकदा अशोक चव्हाण यांनी शिवसेनेकडून संविधानाच्या चौकटीतच काम करण्याचे लिहून घेतल्याचं वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे हा विकास आघाडी तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते कोणत्या ना कोणत्या कारणावरून एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करताना दिसून येतात.

 

First published: January 28, 2020, 12:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading