कोंडी फुटणार, खातेवाटपावर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये अखेर चर्चा!

कोंडी फुटणार, खातेवाटपावर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये अखेर चर्चा!

मात्र खातेवाटपाला उशीर होत असल्याने नाराजीही निर्माण झाली होती. काही महत्त्वाच्या खात्यांबाबात निर्णय होत नसल्याने खातेवाटप अडलं असं बोललं जातंय.

  • Share this:

मुंबई 06 डिसेंबर : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन 9 दिवस झाले मात्र अजुनही खातेवाटप जाहीर केलं नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज चर्चा झाली. मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये ही चर्चा झाली. या चर्चेत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि अजित पवार सहभागी झाले तर शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे सहभागी झाले. या चर्चेत खातेवाटपावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहितीही दिली जातेय. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोघांनी शपथ घेतली होती. मात्र त्यांना खात्यांचं वाटप जाहीर झालं नव्हतं. या मंत्र्यांना बंगल्यांचं आणि कक्षांचं वाटप झालं होतं.

लवकरच होणार 'ठाकरे सरकार'चा मंत्रिमंडळ विस्तार!

मात्र खातेवाटपाला उशीर होत असल्याने नाराजीही निर्माण झाली होती. काही महत्त्वाच्या खात्यांबाबात निर्णय होत नसल्याने खातेवाटप अडलं अशी माहिती आहे. मात्र आता लवकरच मार्ग निघेल आणि खातेवाटप जाहीर होईल असंही बोललं जातंय. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

भाजपला दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. या महाविकास आघाडीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली. शिवाजी पार्क इथं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर इतर 6 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेलं नाही.

धनंजय मुंडेंची भाजपच्या नेत्यावर जहरी टीका, नेतृत्वाकडेही माफी मागण्याची मागणी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात मंत्रिपदांबाबत मोठी स्पर्धा सुरू असल्यानं खातेवाटपला मुहूर्त मिळत नसल्याचं बोललं जात आहे. मात्र आता ही कोंडी फुटणार असल्याची माहिती आहे. विधीमंडळ अधिवेशनाआधी खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राज्यात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या समर्थकांचा नंबर लागावा यासाठी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांचाही यामध्ये समावेश होता.

पंकजा मुंडे भाजप सोडणार का? महादेव जानकरांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

बाळासाहेब थोरात आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास तीस मिनिटे झालेल्या भेटीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा थोरात यांनी केला आहे. दुसरीकडे, नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली. नागपूर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा असा या काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 6, 2019, 6:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading