Home /News /mumbai /

...आणि राजभवनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट टळली

...आणि राजभवनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट टळली

दुपारी 12 वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणवीस राजभवनावर पोहोचले. त्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा राजभवनाकडे...

    मुंबई, 17 जून : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) आणि भाजपचे  (BJP) विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. युती तुटल्यानंतर दोन्ही नेते शक्यतो कधी आमनेसामने आले नाही आणि आजही तसंच घडलं. राज्यपालांना (governor bhagat singh koshyari) वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दोन्ही नेते राजभवनावर पोहोचले खरे पण समोरसमोर भेटण्याचे मात्र, दोन्ही नेत्यांनी टाळलं. त्याचं झालं असं की, राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच ट्वीट करून राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास राजभवनावर पोहोचले आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा राज्यपालांना शुभेच्छा देण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले होते. मुख्यमंत्र्यांचा गाड्याचा ताफा वेगाने राजभवनाकडे निघाला होता आणि राजभवनात फडणवीस यांनी राज्यपालांशी चर्चा करून निरोप घेतला. फडणवीस यांचा ताफा राजभवनातून बाहेर पडला आणि तेच मुख्यमंत्र्यांचा ताफा गेटमधून आत आला. फडणवीस यांचा ताफा बाहेर पडताच काही क्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राजभवनात एंट्री झाली. राजभवनावर मात्र, या नेत्यांची भेट मात्र होऊ शकली नाही. विशेष म्हणजे, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा दीड वर्ष संघर्ष असला तरी महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राजभवनावर पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष सिंग आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या