‘मुख्यमंत्री काम करत नाहीत म्हणून राज्यपालांकडे जावं लागतं’, भाजपने शिवसेनेला सुनावलं

‘मुख्यमंत्री काम करत नाहीत म्हणून राज्यपालांकडे जावं लागतं’, भाजपने शिवसेनेला सुनावलं

BJP Vs Shivsena 'तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही हे लक्षात आहे. या भ्रमातून शिवसेनेने लवकरात लवकर बाहेर आलं पाहिजे. या राज्यातील प्रत्येक नागरिक म्हणजे महाराष्ट्र आहे.'

  • Share this:

मुंबई 31 ऑक्टोबर: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यपाल भगसिंह कोश्यारी (Maharashtra governor bhagat singh koshyari) यांची भेट घेतल्यामुळे सुरू झालेली राजकीय चर्चा थांबायला तयार नाही. यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उत्तर दिलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेत्यांच कामे करत नाहीत त्यामुळेच सगळ्यांना राज्यपालांकडे जाण्याची वेळ येते असं त्यांनी शिवसेनेला सुनावलं. या आधी नेते राज्यपालांना भेटत नव्हते का असा सवालही दरेकर यांनी केला.

प्रविण दरेकर म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही हे लक्षात आहे. या भ्रमातून शिवसेनेने लवकरात लवकर बाहेर आलं पाहिजे. या राज्यातील प्रत्येक नागरिक म्हणजे महाराष्ट्र आहे. राज्यातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर राज्य सरकारकडून मिळत नाही म्हणून सगळे जण राज्यपालांना जाऊन भेटत आहेत.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही याच भावनेतून राज्यपालांना भेटले. या आधीही अनेकदा नेते राज्यपालांकडे आपलं गाऱ्हाने घेऊन गेले आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री न्याय देत नाहीत. मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी कामे केली तर राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांना आणि सामान्य माणसांना राज्यपालांची भेट घेण्याची गरज नाही असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) हे राज्याचे प्रमुख असताना राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटणं योग्य नसल्याचं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

कंगनाचं 'टिव टिव' सुरूच, आता थेट महात्मा गांधींसह नेहरूंवर साधला निशाणा

संजय राऊत म्हणाले की, कदाचित देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही शरद पवारांचे मार्गदर्शन घेत असतील. पण मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणं योग्य नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. इतर विषय ठिक हे पण वीज बिलासाठी राज्यपालांकडे गेल्याचं यापूर्वी ऐकिवात नाही. असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं. राजभवन ही राजकारणाची जागा नाही. आम्ही घटनात्मक पदाचा सन्मान करतो, असं सांगत राऊत यांनी राज्यपालांनाही चिमटा काढला.

'शिवाजी महाराजांच्या वंशजांनी इतर समाजासाठी सुद्धा काम करावे'

दरम्यान, राज ठाकरे यांनी 29 ऑक्टोबर रोजी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ आणि वाढीव वीज बिलाबद्दल राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन दिले होते. यावेळी राज्यपालांनी शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 31, 2020, 2:55 PM IST

ताज्या बातम्या