मुंबई, 1 ऑगस्ट : मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरच्या (
Ghatkopar mankhurd link road) उड्डाणुलाचं (
Flyover) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (
CM Uddhav Thackray) यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पूर्वी मी या रस्त्याने येत नव्हतो. पण आता रोज रोज इकडं यावंसं वाटतं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. या पुलामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून (
Traffic Jam) सुटका होणार असून नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. इंधन तर वाचेलच, मात्र प्रदुषणाची हानीदेखील कमी होईल, असा दावा प्रशासनाननं केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे, महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री नवाब मलिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
केवळ नारळ वाढवत नाही
मी काही केवळ नारळ वाढवून आलो नाही, तर काम सुरु करून आलो आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मुंबई मॉडेलसाठी आपलं कौतुक केलं जातं, मात्र हे यश प्रशासनाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. वास्तविक, लोक ज्यांना काम करण्याची संधी देतात, त्यांना सरकार म्हणतात. मात्र संधी मिळूनही जे काम करत नाहीत, ते नालायक असतात, असं सांगताना आपण नालायक नसल्याचं त्यांनी सांगितलं. उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर पुलाखाली नवी वस्ती तयार होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.
हे वाचा -
खुर्ची सोडा, मग आम्ही बघू; नाना पटोलेंची राज्यपालांवर टीका
नव्या पुलाची वैशिष्ट्यं
- घाटकोपर-मानखुर्द जोड रस्ता हा सायन पनवेल महामार्ग व पूर्व द्रुतगती मार्ग यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे.
- या रस्त्यावर पूर्व द्रुतगती मार्ग, सांताक्रुझ चेंबूर जोडररस्ता तसेच पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूकीची कोंडी सोडविण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने या उड्डाणपूलाचे काम हाती घेऊन पूर्ण केलेले आहे.
- हा उड्डाणपूल शिवाजी नगर, बैंगणवाडी, देवनार क्षेपणभूमी व मोहिते पाटील नगर हे पाच (५) महत्वाचे जंक्शन व देवनार नाला, चिल्ड्रेन एड नाला, पी.एम.जी.पी. नाला या तीन (३) मोठया नाल्यांवरुन विस्तारित होत आहे.
- उड्डाणपूलाचे बांधकाम “खंडजोड" (सेगमेंट) तंत्रज्ञानाने व " एक स्तंभ" पध्दतीने केलेले असल्याने पूलाखालील रस्त्यावर मार्गिकादेखील वाहतूकीसाठी वापरात आलेली आहे.
- उड्डापुलासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रथमतःच अखंड पध्दतीने २४.२ मीटर लांबीचा सेगमेंट तयार करण्याचे तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे.
- प्रकल्पाची एकूण किंमत ५८० कोटी
- पूलाची एकूण लांबी = २.९९१ कि.मी.
- पुलाची एकूण रुंदी= २४.२ मीटर
- एकूण मार्गिका = ३+३ (उत्तर वाहिनी + दक्षिण वाहिनी)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.