News18 Lokmat

हा विजय म्हणजे ट्रेलर आहे- मुख्यमंत्री

हा विजय म्हणजे ट्रेलर आहे. मोदींनी दिलेला विकास आणि विश्वास, अमित शहांचं संघटन यामुळे भाजपला त्रिपुरा, नागालँडमध्ये विजय मिळवता आला, ही प्रतिक्रिया आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 4, 2018 12:22 PM IST

हा विजय म्हणजे ट्रेलर आहे- मुख्यमंत्री

मुंबई, 04 मार्च : हा विजय म्हणजे ट्रेलर आहे. मोदींनी दिलेला विकास आणि विश्वास,  अमित शहांचं संघटन यामुळे भाजपला त्रिपुरा, नागालँडमध्ये विजय मिळवता आला, ही प्रतिक्रिया आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. भाजपच्या विजयोत्सवानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, 'गुजरात, हिमाचल, त्रिपुरा या तीनही राज्यात जनतेनं 49 ते 50 टक्के मते दिली आहेत. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलाय. आदिवासी समाजाने मोदींवर मोठा विश्वास दाखवला आहे.

जे मोदींच्या नेतृत्वावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हा विजय त्यांना उत्तर आहे, असंही ते म्हणाले. भारताचा विश्वास मोदींवर आहे, भाजपच कर्नाटक निवडणूक जिंकणार आणि 2019 मध्ये पुन्हा एनडीएचे सरकार येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  एवढे यश कधीच कुणाला मिळाले नाही,  मोदींची गरीब कल्याण नीती देशाला भावली आहे, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2018 12:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...