जाहिरातीतले लाभार्थी खरे आहेत- मुख्यमंत्री

जाहिरातीतले लाभार्थी खरे आहेत- मुख्यमंत्री

सरकारच्या 3 वर्षांच्या वाटचालीबद्दल बोलताना ते म्हणाले, गेल्या 3 वर्षांत सरकारनं मोठी वाटचाल केली आहे. तीन वर्षांच्या लाभार्थीच्या ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्या खऱ्या आहेत. त्यातली माणसंही खरी आहेत.

  • Share this:

06 नोव्हेंबर : आयबीएन लोकमत आजपासून  news18lokmat या नवीन रूपात आलंय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'आयबीएन लोकमत'चं रिलॉंचिंग झालं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, IBN लोकमतनं 10 वर्षांत वेगळा ठसा उमटवलाय. सरकारच्या 3 वर्षांच्या वाटचालीबद्दल बोलताना ते म्हणाले, गेल्या 3 वर्षांत सरकारनं मोठी वाटचाल केली आहे. तीन वर्षांच्या लाभार्थीच्या ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्या खऱ्या आहेत. त्यातली माणसंही खरी आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

शेतीमध्ये गुंतवणूक झाली पाहिजे

ग्रामीण भागात वीज कनेक्शन, जलयुक्त शिवार योजना राबवली

शेतीचा विकासदर 12 टक्क्यांनी वाढला

3 वर्षं मागे वळून बघताना समाधानी

कर्जमाफीनं कुठलाही शेतकरी सक्षम होत नाही

'लाखो शेतकऱ्यांना सावकारी पाशातून बाहेर काढण्याचा प्रयत्न'

सर्वात जास्त शौचालयं महाराष्ट्रात

3 वर्षांत राज्य सरकारची उल्लेखनीय कामगिरी

माझ्यावर होणारी टीका निराशेतून

चुकीच्या टीकेला त्याच ताकदीनं उत्तर

चुकांमधून शिकणारा पुढे जातो

राज्यात 50 हजार कोटींची थेट परकीय गुंतवणूक

मी कधीच कुणाला आव्हान दिलेलं नाही

शिवसेना 25 वर्षांपासून आमचा मित्रपक्ष

उद्धव ठाकरेंसोबत माझे चांगले संबंध

हे सरकार स्थिर आहे, 5 वर्षं पूर्ण करेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2017 08:42 PM IST

ताज्या बातम्या