दीड लाखांवरील कर्ज भरलं तरच कर्जमाफीचा लाभ-मुख्यमंत्री

दीड लाखांवरील कर्ज भरलं तरच कर्जमाफीचा लाभ-मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना बँकांमार्फत कर्जमाफी केली तर बँका त्यांच्या व्याजाची रक्कम वळती करून घेतील, म्हणून हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

  • Share this:

29 जून : जोपर्यंत शेतकरी दीड लाखाच्या वरचं कर्ज भरणार नाहीत तोपर्यंत त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलीय. शेतकऱ्यांना बँकांमार्फत कर्जमाफी केली तर बँका त्यांच्या व्याजाची रक्कम वळती करून घेतील, म्हणून हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

तसंच यापूर्वी जी कर्जमाफी झाली होती त्यातही बऱ्याचशा बाबी सारख्या होत्या त्यामुळे विरोधकांनी कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून विनाकारण बाऊ करू नये, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

शेतकरी कर्जमाफीसाठी 34 हजार कोटी लागणार असल्याने राज्यातील विकासकामांवरही निश्चितच परिणाम होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मुंबईतील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीय.

भायखळा जेलमधील कैदी मृत्यू प्रकरणातलं सत्य लवकरच तुमच्या समोर येईल असंही मुख्यमंत्री म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 02:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading