मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फुटबॉल मिशन वन मिलिनीयमचं उद्घाटन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फुटबॉल मिशन वन मिलिनीयमचं उद्घाटन

भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज एकाच दिवशी 10 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये आज फूटबॉल खेळला जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फुटबॉल मिशन वन मिलिनीयमचं उद्घाटन पार पडलंय. भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज एकाच दिवशी 10 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये आज फूटबॉल खेळला जाणार आहे.

फुटबॉल मिशन वन मिलियनच्या निमित्ताने महाराष्ट्र फुटबॉलमय होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिफा अंडर 17 विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने (FIFA U-17 World Cup India 2017)  देशात १ कोटी १० लाख लोकांनी फुटबॉल खेळावे अशी कल्पना मांडली आहे.

पंतप्रधानांच्या कल्पनेला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकरने फुटबॉल महाराष्ट्र मिशन १-मिलियनची घोषणा केली आहे. या घोषणेअंतर्गत आज राज्यभर १० लाख पेक्षा अधिक विद्यार्थी, युवक फुटबॉल खेळणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2017 10:08 AM IST

ताज्या बातम्या