मुंबई, 18 मे : केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मेण्याच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय.
मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण पार पडलं. आता हा पुतळा लोणावळ्यात सुनील्स वॅक्स म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे. सुनील्स वॅक्स म्युझियमचे प्रमुख सुनील कंडलूर यांनी आठवले यांचा हा पुतळा साकारला आहे. आपलाच पुतळा पाहुन रामदास आठवले यांनी हा माझाचा पुतळा आहे का ? प्रश्न उपस्थिती करून आश्चर्य व्यक्त केलं आणि सुनील कंडलूर यांचं कौतुक केलं.
तर आठवले सध्या केंद्र सरकारमध्ये आहे. ते ज्या पदावर आहे त्या पेक्षा मोठे स्थान रामदास आठवलेंना निश्चित मिळणार आहे असं सांगत आठवलेंना केंद्रात कॅबिनेटमंत्रीपदाचा दर्जा देण्याची रिपाइंची अपेक्षा पूर्ण होणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.