Elec-widget

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्र्यांनी केलं भूमीपूजन

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्र्यांनी केलं भूमीपूजन

  • Share this:

22 एप्रिल :  अखेर मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालां आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुनर्विकास प्रकल्पांचे ई-भूमिपूजन करण्यात आलं. त्यामुळे अनेक वर्ष रखडलेल्या या प्रकल्पातील रहिवाश्यांना दिलासा मिळाला असला, तरी हा प्रकल्प विनाविलंब पूर्ण करण्याचं आव्हान सरकार समोर असणार आहे. दरम्यान, आजच्या या भूमिपूजनामुळे बीबीडी चाळीतील रहिवाशांमध्ये आनंदाचं वातावरणा आहे.

डिलाईल रोड वरील बीडीडी चाळीत तीन पिढ्यांपासून रहाणारे धोंडिबा गोविलकर. त्यांचं निवृत्ती नंतरचं आयुष्यही, याच १८० चौरस फुटांच्या घरात कसंबसं सुरू आहे. आजपर्यंत अनेक सरकारांनी त्यांच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या चर्चा केल्या. पण प्रत्यक्षात मात्र हाती काहीच लागलं नसल्याची त्यांची ते सांगतायेत.

तीन चार पिढ्या याच बीडीडी चाळीत घालवलेले इथे हजारो कुटुंब आहेत. आता त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालांय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २२ एप्रिलला बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे.

बीडीडी चाळींचा पुनर्विकास

१) नायगाव, डिलाईल रोड, वरळी इथल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास

Loading...

२) १९४ चाळीत एकूण १६ हजार २०३ कुटुंबं

३) सध्या १८० चौ.फूट घर, त्यांना ५०० चौरस फुटांचं घर

४) रहिवाशांना आहे त्याच ठिकाणी घरं मिळणार

५) २३ मजली इमारती उभारणार

६) विक्रीसाठी ६० मजली इमारती उभारणार

७) उर्वरित जागेवर म्हाडा परवडणारी घरं बांधणार

याआधीच्या सरकारने बीडीडी चाळींच्या पुनर्विकाचे अनेक वायदे केले. पण ते कधीच प्रत्यक्षात उतरले नाहीत. सध्याचे सरकार मोठ्या थाटामाटात पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपूजन करेल. त्याच बरोबर हे प्रकल्प विनाविलंब लवकर कसे पूर्ण होतील. यासंदर्भातही सरकारने सतर्क राहणं महत्वाचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2017 01:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...